मनपाचा इशारा: जनावरांना मोकाट साेडू नका; मनपाचा इशारा – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
लम्पी आजाराने थैमान घातले असून, जनावरांना मोकाट न सोडता आवश्यक प्रथमोपचार करून व गोठ्याची योग्य स्वच्छता राखून जनावरे बंदिस्त ठेवावीत, असे आवाहन महापािलका प्रशासनाने केले आहे. मनपाच्या कोंडवाड्यात बंदीस्त करण्याची कारवाई करताना जनावरांना काही आरोग्‍य विषयक समस्या उद्भवल्यास याची संपूर्ण जबाबदारी जनावराच्या मालकांची राहणार असल्याचेही मनपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
लम्पी राेगामुळे अनेक जनावरे दगावली आहेत. शेतकऱ्यांना जोडव्यवसाय व शेतीकामात जनावरांची महत्वाची भूमिका असते. आधीच शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले असून, अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यात जोडधंदा म्हणून शेतकरी बांधवांना त्यांच्याकडील जनावरांच्या माध्यमातून संसार चालवण्यासाठी थोडी मदत होत होती, मात्र आता या लम्पी आजाराने शेतकरी आणखी आर्थिक संकटात सापडले आहेत. लंपी आजारचा जनावरांवर असलेला प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, राेगाच्याा नियंत्रणसाठी महापािलकेकडून उपाययाेजना करण्यात येत आहे. पाळीव जनावरांचे वास्तव्य असलेल्या जागा, गोठे, तबेल येथेे सोडियम हाईपोक्लोराईड या द्रावणाने फवारणी करण्यात येत आहे. लंपी आजाराने ग्रस्त असलेली जनावरे आढळून आल्यास लसीकरण करण्याकरता पाठवण्यात येत आहेत, अशी माहिती कळवण्यात आली आहे.
माेकाट गुरे काेंडवाड्यात
मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांसह पाळीव जनावरेसुद्धा आढळून येत आहे. या जनावरांना लंपी आजाराची लागण होऊ नये व रहरदारीसही अडथळा हाेऊ, नये यासाठी कोंडवाडा विभागामार्फत रस्त्यावर आढळून येणारी जनावरे पकडण्याची कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares