Latest Marathi News | पूर्वहंगामी द्राक्षांना खुड्याच्या मुहूर्तावर; कसमादे पट्यात किलोला दीडशेचा भाव – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
नाशिक : कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा (कसमादे) पट्यात गेल्या चार वर्षात प्रतिकूल हवामान परिस्थितीत शेतकरी पूर्वहंगामी द्राक्षांचे उत्पादन घेताहेत. यंदा अतिवृष्टी आणि हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा दणका बसला आहे. बागलाण तालुक्यात चोवीस तासांपूर्वी द्राक्षांच्या खुड्याचा मुहूर्त झाला. शिवार खरेदीमध्ये या द्राक्षांना किलोला दीडशे रुपयांचा भाव मिळाला आहे. गेल्यावर्षीपेक्षा तो वीस रुपयांनी अधिक आहे. (time of preseason grapes price of kasmade area is 150 per kg Nashik Latest Marathi News)
नवरात्रोत्सवामुळे उत्तर भारतात द्राक्षांना चांगली मागणी राहत असल्याने या पट्यातील शेतकरी शेतकरी जूनमध्ये गोड बहाराची छाटणी करतात. यंदा अतिवृष्टीमुळे या हंगामावर परिणाम झाला आहे. वाजगाव (ता. बागलाण) येथील शेतकरी चैत्राम पवार यांनी सोनाका वाणाच्या द्राक्षांचे उत्पादन घेतले आहे.
गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही पहिल्यांदा द्राक्ष खुड्याचा मान श्री. पवार यांनी मिळवला. गेल्यावर्षी उत्तर भारतातील व्यापाऱ्यांनी १३० रुपये किलो या भावाने शिवार खरेदी केली होती. मात्र यंदा मागणी असल्याने या व्यापाऱ्यांनी दीडशे रुपये भाव देण्यास सुरवात केली आहे. द्राक्षांचे उत्पादन कमी असल्याने ही दरवाढ मिळाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा: दिक्षी गावात दारूबंदीसाठी महिला आक्रमक; यतीन कदमांनी पोलिसांना धरले धारेवर
काढणी पश्चात कामकाज अन व्यवहार
पूर्वहंगामी द्राक्षांचे खुडे केल्यानंतर माल काढणीपश्चात शेडमध्ये आणून हाताळणी व प्रतवारी करून घेतली जात आहे. बाजाराच्या मागणीनुसार अर्धा किलो वजनाचे १० पॅनेट ५ किलो वजनाच्या पेटीमध्ये भरून माल पाठवला जात आहे. प्रतिपेटी ७५१ रुपये दर ठरविण्यात आला आहे. हा माल देशांतर्गत कानपूर (उत्तरप्रदेश) येथे पाठवण्यात येत आहे. पहिल्या दिवशी दीड टन मालाचा खुडा झाला आहे. किलोमागे १० रुपये खर्च येत असल्याचे शेतकरी चैत्राम पवार यांनी सांगितले
"गेल्यावर्षी २८ जूनला, तर यंदा ११ जूनला गोड बहाराची छाटणी केली आहे. माझी साडेचार एकर द्राक्ष बाग असून अडीच एकरावर पूर्वहंगामी द्राक्षांचे उत्पादन घेतो. सव्वा एकरवर १०१ दिवसांचा तयार द्राक्षांची काढणी सुरू झाली आहे. उत्पादन घेताना अतिवृष्टीमुळे करपा, डाऊनी अशा समस्या मोठ्याप्रमाणावर असल्याने उत्पादनावर परिणाम आहे. दुसऱ्या टप्प्यात सव्वा एकरावरील काढणी होईल. उर्वरित दोन एकरावरचा निर्यातक्षम माल दिवाळीत काढला जाईल."
– चैत्राम पवार, द्राक्ष उत्पादक
हेही वाचा: Saptashrungi Gad : सप्तश्रृंगी देवीच्या मूळ मूर्तीवर पंचामृत अभिषेक का होणार नाही?
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares