Marathi News Live Update : अमरावतीत आज शिंदे गटाचा मेळावा – TV9 Marathi

Written by

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
Sep 24, 2022 | 8:56 PM
इंदापूर अजित पवार
ऑन पाकिस्तान झिंदाबाद घोषणा..
– अशा प्रकारची वृत्ती असणारी किंवा देशद्रोही विचाराचे लोक आपल्या देशात राहून अशा घोषणा देण्याचं धाडस करतात, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.. – सकाळपासून बारामती-इंदापूर परिसरात असल्यामुळे अधिकची माहिती नाही.. त्याबद्दल अधिक माहिती घेईल.. असं काही घडून कार्यवाही झाली नसेल तर गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्यासाठी भाग पाडू..
ऑन सुप्रिया सुळे मॉर्फ फोटो
– हे असले प्रकार.. जे खालच्या थरावरच राजकारण सुरु आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.. हे असले प्रकार सर्वच राजकीय पक्षानी बंद करा.. त्यातून कोणाचेही हित साधले जाणार नाही.. ज्यांचं राज्य करावं.. पण इतक्या खालच्या पातळीवर हिणवण्याचं काम कुणी करु नका.. हे आपल्याला कुणीही शिकवलेलं नाही.. अशा प्रकारचे चुकीचे पायंडे पाडू नका.. संबंधितांना त्यांच्या पक्षाच्या वरीष्ठांनी तंबी द्यावी.. जे ऐकणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी..
ऑन सुप्रिम कोर्ट निकाल
– हे होणार का नाही याची कुणालाच खात्री नाही.. – हे प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे.. – सलग पुढच्या तारखा पडत आहेत.. – आम्ही लक्ष ठेवून आहोत.. – जे खंडपीठ निर्माण केलंय, त्यांनी लोकशाहीपुढील गंभीर प्रकरणाचा लवकर निकाल घ्यावा..
ऑन शिवाजी पार्क सुप्रीम कोर्ट
– हा रडीचा डाव आहे.. – तिथे उद्धव ठाकरेना विचार मांडू द्या.. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना बोलू द्या.. – ही लोकशाही आहे.. प्रत्येकाला विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे..
ऑन बारामती भाजप रणनिती
– त्यांना त्यांची रणनिती आखू द्या.. – आम्ही आमची रणनिती आखू.. – शेवटी दोघांनी कितीही रणनिती आखली तरी मतदारराजा मतदान करणार आहे.. – कोण आपला विकास करतो, कोण आपले प्रश्न संसदेत मांडेल, कोण सुखदुखात सोबत राहील याचा विचार करुन मतदारराजा योग्य बटण दाबेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही..
ऑन निवडणुक लांबणीवर
– सप्टेंबर अखेरपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या जाणार होत्या.. – ठराविक जिल्ह्यात परतीचा पाऊस पडतो, त्याचा मतदानावर फारसा परिणाम होणार नाही.. – आम्ही सरकारमध्ये असतो तर आता निवडणुका लागल्या असत्या.. – आताच्या सरकारला प्रभाग पद्धत, आरक्षणाचे प्रश्न असे विषय आलेत.. – भाजप आणि शिंदे गट एकत्र निवडणुक लढल्यानंतर काय निकाल लागेल याची खात्री नसल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलतात असे माझे मत.. – राज्य निवडणुक आयोगाने जशा ग्रामपंचायत निवडणुका जाहिर केल्या, त्यांनी याबाबत योग्य भुमिका घेवून निवडणुका जाहिर कराव्यात..
ऑन निर्मला सितारामण आरोप
– हा धांदात खोटा आरोप आहे.. बिनबुडाचा आरोप आहे.. यात कोणतंही तथ्य नाही..
ऑन हर्षवर्धन पाटील कॉंग्रेस टिका
– 73-74 वी घटनादुरुस्ती झाल्यानंतर शासकीय पैसा थेट ग्रामपंचायतपर्यंत यायला लागला.. – काही लोकं विसरुन जातात पूर्वीच्या गोष्टी.. आणि नविन ज्या पक्षात प्रवेश करतात, त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी अशा प्रकारच्या वल्गना करतात.. त्याला फारसं महत्व द्यायचं कारण नाही..
ऑन शिवसेना-राष्ट्रवादी युती
– पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे यांनी ठरवलं तर निश्चित युती होईल..
पुणे
पुण्यात शितल म्हात्रेंवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता
राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं सायबर पोलीस ठाण्यात दिली तक्रार
सायबर पोलिसांनी तक्रार घेतली नोंदवून
शितल म्हात्रेंवर गुन्हा दाखल करा कार्यकर्त्यांची मागणी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कांबळेंनी दिली पोलीसांत तक्रार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 5 तारखेला दसरा मेळावा आहे
बीकेसीवर आपला मेळावा होणार आहे
कोणाचा मेळावा मोठा होतो ते आता पाहूनच घेऊ..
मंत्री संदीपान भुमरे यांचं वक्तव्य..
पुणे
– पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या पीएफआयच्या विरोधात आता मनसे आक्रमक,
– हर हर महादेव म्हणत उद्या पीएफआय संघटनेच्या विरोधात मनसे उद्या निषेध आंदोलन करणार,
– पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या पीएफआयच्या कार्यकर्त्यावर तात्काळ कारवाई करण्याची।मनसेची मागणी,
– पुण्यातील अलका टॉकीज चौकात मनसे उद्या आंदोलन करणार
निर्मला सीतारामन
– ऑइल रिफायनरी रत्नागिरीला होणारी विरोध करणारे कोण होते, सगारमाला प्रकल्पाला विरोध करणारे कोण होते ?महाविकास आघाडीने विरोध केला,
– मेट्रो फेस 3 ला आरे कारशेडला थांबवणारे कोण होते,
– मग आता कशाला रडतायत,
– मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला परवानगी दिली असती, पंतप्रधानांना श्रेय जाणार म्हणून परवानगी दिली गेली नाही
– वेदांतावरून आम्हाला प्रश्न विचारण्याआधी त्यांना प्रकल्पाना विरोध का केला यावर प्रश्न विचारा
अमरावती मंत्री संदीपान भुमरे
आम्ही सगळ्यांनी स्वतः एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी तयार केलं..
आम्हाला गद्दार म्हणायचं अधिकार यांना नाही. आमचा विरोध होता जेव्हा महाविकास आघाडी झाली तेव्हा. पण आमचं ऐकायला कोणीच नव्हतं..
पक्षप्रमुख जर मुख्यमंत्री होत असतील तर आपण शांत राहील पाहिजे असं एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सांगितले. पण जेव्हा ते मुख्यमंत्री झाले ते कोणालाही भेटले नाही. जर मंत्र्यांना ते भेटत नसतील तर तुम्ही खूप लांबच राहिले..
उद्धव साहेब सांगत होते की तुम्ही फक्त संघटना वाढवा काम आणायचं नाही असे ते बोलत होते.
आम्हाला फक्त ते टीव्हीवर दिसत होते. टीव्ही बंद की मुख्यमंत्री आम्हाला दिसतच नव्हते..
आम्हाला एकदा वर्षावर बोलवलं बैठक साठी तेव्हा आम्हाला म्हणाले की कोणीतरी भेटायला आले मी जातो आणि ते उठून गेले. सांगा अशाने काय कामं होणार..
माझा अनुभव सांगतो, एक प्रकल्प केलं तर खूप फायदा होईल शेतकऱ्यांना पण अडीच वर्षे गेले पण माझं पत्र त्यांनी पाहिलं नाही..
कोरोना काळात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कोणत्याही जिल्ह्यात गेले नाही पण त्यांना वेळ नव्हता. अशा मुख्यमंत्री यांचा काय फायदा.. ज्यावेळी लक्षात आले की, उद्धव ठाकरे पूर्णपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जाळ्यात अडकले..
देशाची पहिली घटना आहे की सत्तेतील मंत्री बाहेर पडले. मी कॅबिनेट मंत्री होतो तरीही मी माझं पद धोक्यात टाकले कारण आम्हाला शिवसेना वाचवायची होती. बाळासाहेब यांचे विचार वाचवायचे होते..
खरी गद्दारी मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी केली. आम्हाला गद्दार म्हणायचं अधिकार यांना नाही..
खरी सरकार चालवत होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी..
आमदार नितीन देशमुख पण आमच्या गाडीत बसलो होतो तेव्हा इतक्या गप्पा मारत होते की, शिंदे साहेब तुम्ही मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही, मी पक्का देशमुख आहे. मग जेव्हा आम्ही गुहावटी गेलो तेव्हा1 त्याला कोणाचा तरी फोन आला आणि हा पलटला. तेव्हा त्याला एकनाथ शिंदे यांनी स्पेशल फ्लाईट करून त्याला परत पाठवलं..
मातोश्रीवर गोचीड जमा झाले आहे.. कोणत्याच फाईलवर सही करत नव्हते हे गोचीड त्यांना सांगत होते सही करू नका अडचणीत येणार.. त्यामुळे कोणाचेच कामं झाले नाही..
मराठा आरक्षनातील नोकऱ्या असो की ओबीसी आरक्षण असो ते सगळे कामे हाती घेतले आहे..
ज्यांनी कधी गाद्या उचलल्या नाही त्याला मंत्रिपद दिलं. पालकमंत्री पद दिलं मग गद्दार कोण..
गद्दार आणि खोटे बस इतकंच आता उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना बोलावं लागणार..
खरी शिवसेना ही 55 पैकी 40 आमदारांची आणि 18 पैकी 12 खासदारांची आहे…
वर्षा बंगला सोडलं तेव्हा एखादी नवरी कशी घर सोडले तसं यांनी सोंग केला.. आम्ही भेटायला गेलो की मास्क बांधून ठेवत होते आणि सरकार गेलं तेव्हा मास्क ही गेला, खुर्चीही गेली आणि कोरोनाही गेला..
बीड आरोग्यमंत्री तानाजी सावंत
माझ्याकडून साहित्यिक बोलण्याची अपेक्षा करू नका मुख्यमंत्र्यावर टीका करताल तर बीडमध्ये येऊन नागडं केल्याशिवाय राहणार नाही अशी टीका आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्र्यावर टीका करण्या अगोदर तुमचे चारित्र्य तपासा असं देखील यावेळी बोलताना सावंत म्हणाले आहेत..
आमच सरकार आलंकिच अचानक मराठे जागे कसे झाले असं म्हणत तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणे महाविकास आघाडीच्या सरकारमुळेच रद्द झालं असा देखील आरोप केला आहे..ज्या समितीला मराठ्यांना आरक्षण नको आहे अशी समिती त्या सरकारने स्थापन केली होती त्यामुळे आरक्षण मिळाला नाही.माझी देखील आरक्षणासंदर्भात टिकाऊ आरक्षणाची मागणी असल्याचं ते म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे आम्हाला म्हणतात की तुम्ही माझ्या बापाचे फोटो लावू नका यावर तानाजी सावंत यांनी पलटवार करत तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो का लावता शिवाजी महाराज आणि तुमचा संबंध काय असा थेट सवाल ठाकरे यांना केला आहे.. ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातलं त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली असा खोचक तुला देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे अमरावती दौऱ्यावर
दुपारी 4 वाजता अमरावतीत शिंदे गटाचा पहिला मेळावा
मंत्री संदीपान भूमरे यांच्या मेळाव्याकडे सर्वांच लक्ष
शिंदे गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मंत्री भूमरे साधणार संवाद
दसरा मेळाव्यावरून सोमवारी शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार – सूत्रांची माहिती
वरिष्ठ वकिलांची फौज तयार करण्याच्या हालचालींना वेग – सूत्र
सुप्रीम कोर्टात तातडीची सुनावणी घेण्यासाठी याचिका करणार सूत्र
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होऊ नये यासाठी प्रयत्न
दापोली समुद्रकिनारी सापडलेली बोट संशयास्पद नाही
तटरक्षक दलाचा खुलासा
विजयदुर्ग किनाऱ्यावर बुडालेल्या पार्थ जहाजाच्या लाईफ क्राफ्टचा तो भाग
काल स्थानिक मच्छिमारांकडून प्रशासनाला देण्यात आली माहिती
नागरिकांनी घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन
याच लाईफ क्राफ्टच्या माध्यमातून करण्यात आली होती 19 जणांची सुटका
औरंगाबाद शहरात महविकास आघाडीचे धरणे आंदोलन
अतिवृष्टी आणि शेतकरी आत्महत्या प्रकरणी धरणे आंदोलन
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी तीनही पक्षांचा सहभाग
आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्यासंदर्भात बोलावली बैठक
राज्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईतून निरोप
आज दुपारी 1 वाजता नंदनवनला होणार बैठक
दसरा मेळाव्याचं नियोजन करण्यासाठी बोलावली बैठक
सुप्रीम कोर्टातील याचिकेवरही चर्चा होण्याची शक्यता
विरोधी पक्षनेते अजित पवार बारामती दौऱ्यावर
अजित पवारांकडून सिटी सेंट्रल चौकाच्या कामाची पाहणी
बारामतीतील विविध विकासकामांची अजितदादांकडून पाहणी
कामाबाबत अधिकाऱ्यांना सूचना
सामनातून पुन्हा मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार हल्लाबोल
राज्यातील मिंधे सरकार दिल्लीचे वेठबिगार
बेकायदा सरकार वाचवण्यासाठी दिल्लीत मुजरा
सामनामधून एकनाथ शिंदेवर टीकेचे बाण
गंगापूर धरणाच्या जल पूजनाला सोमवारचा मुहूर्त
मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते होणार जलपूजन
दरवर्षी महापौर आणि उपमहापौर यांच्या हस्ते होते जलपूजन
यंदा पहिल्यांदाच आयुक्तांच्या हस्ते होणार जलपूजन
मुंबई : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार? यंदा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क शिवसेनेला मिळणार का? यावरू राजकारण चांगलंच तापलं होतं. अवघ्या राज्याचं लक्ष या प्रकरणातील सुनावणीकडे लागलं होतं. अखेर शुक्रवारी या प्रकरणातील महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या या निर्णायामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र यावरून आज देखील काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गडावरून मोठी बातमी समोर येत आहे. देवीच्या मूर्तीवर दररोज होणारा पंचामृत अभिषेक बंद करण्याचा मोठा निर्णय सप्तशृंगी देवी ट्रस्ट प्रशासनाचा वतीने घेण्यात आला आहे.  यापुढे देवीच्या चांदीच्या 25 किलोच्या उत्सव मूर्तीवर पंचामृत अभिषेक करण्यात येणार आहे.
Published On – Sep 24,2022 7:07 AM
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares