आयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले! शरद पवार, नितीश कुमार यांच्यासह अनेक – ABP Majha

Written by

By: एबीपी ब्युरो | Updated at : 25 Sep 2022 05:04 PM (IST)
Edited By: सतिश केंगार
Opposition parties united in INLD’s rally
Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्ष नेत्यांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. आज देशाचे माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांच्या 109 व्या जयंतीनिमित्त हरियाणामध्ये अनेक विरोधी पक्ष नेते एकवटले आहेत. आयएनएलडी पक्षाचे अध्यक्ष ओपी चौटाला यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, एसएडीचे नेते सुखबीर बादल हरियाणामध्ये दाखल झाले आहेत. आयएनएलडीच्या ‘सन्मान दिन रॅली’मध्ये सहभागी होण्यासाठी हे नेते पोहोचले आहेत. यावेळी बोलताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला लक्ष करत म्हटलं आहे की, ”सरकारने शेतकरी नेत्यांवरील खटले मागे घेण्याचे आश्वासन दिले, परंतु ते पूर्ण केले नाही.”
Govt promised to withdraw cases filed against farmer leaders, but has not fulfilled it: NCP supremo Sharad Pawar at INLD rally

रॅलीला संबोधित करताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, ओम प्रकाश चौटाला यांना फसवून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. त्यांनीच आम्हाला भाजप सोडण्यास सांगितले, आम्ही त्यांचे म्हणणे ऐकले. गेल्या निवडणुकीत आमच्या उमेदवाराचा पराभव करण्यात त्यांचा सहभाग होता. मला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, ते (भाजप) आश्वासन दिल्याप्रमाणे काम करत नव्हते. नितीश कुमार म्हणाले की, बिहारमध्ये 7 पक्ष एकत्र आले आहेत. 2024 मध्ये ते (भाजपला) जिंकू शकत नाही. संपूर्ण देशाला संघटित केले पाहिजे. चौटाला तुम्ही लोकांना जोडायला सुरुवात करा. सर्व प्रकारची लोक जोडा आणि याबाबत आम्ही काँग्रेसलाही विनंती केली आहे. असे झाल्यास 2024 मध्ये त्यांचा पराभव होईल.

यादरम्यान तेजस्वी यादव यांनीही आपल्या भाषणात भाजपवर जोरदार निशाणा साधला. तेजस्वी यादव म्हणाले की, ”आजचा दिवस सन्मान दिन म्हणून साजरा केला जात आहे. आज आपण खुर्चीवर बसलो आहोत, यामध्ये चौधरी देवी लाल यांचे मोठे योगदान आहे. आमच्या वडिलांची तब्येत ठीक नाही, अन्यथा तेही या कार्यक्रमत उपस्थित असते. चौधरी देवीलाल यांनी शेतकऱ्यांना एकत्र केलं, समाजवाद्यांना मजबूत केलं. आज केंद्रात बसलेल्या लोकांना या देशात फक्त भाजप आणि संघ हवा आहे, बाकी सर्व काही संपले पाहिजे, असं त्यांनी वाटत.” ते म्हणाले की, पंजाबच्या जनतेने शेतकरी आंदोलन करून भाजपला एक चांगला धडा शिकवला.
82 गेहलोत समर्थक आमदार राजीनामा देण्याची शक्यता, सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करायला विरोध?
Lok Sabha Election 2024: ‘देशातून भाजपला संपवू’, लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांनी घेतली सोनिया गांधींची भेट
‘गेहलोत कॅम्पचे 65 आमदार पायलट यांना मुख्यमंत्री करायला तयार नाही’, गेहलोत घेणार पक्ष प्रभारींची भेट
Viral Video: किल्ले रायगडावर पिंडदान विधी?; विनोद पाटलांकडून जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
आयएएस अधिकारी नसतानाही पालिका आयुक्तपदी निवड कशी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका
Attorney General : केंद्र सरकारची ऑफर मुकुल रोहतगींनी नाकारली, नवे अॅटर्नी जनरल कोण होणार?
Mumbai News : मुंबईत विलेपार्ले येथे आठ ते दहा घरे कोसळली, 40 पेक्षा जास्त घरांना तडे
IND vs AUS: भारतानं टी-20 मालिका जिंकली! सूर्या- विराटची चमकदार खेळी; ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनं पराभव
Mankading Laws : धावबादचा तो नियम काय आहे? दिप्ती शर्माच्या अॅक्शनवरुन सुरु झालाय वाद 
PFI : पीएफआय कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल नाही, चिथावणीखोर वक्तव्याबद्दल गुन्हा; पुणे पोलिसांची माहिती

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares