Agriculture News : अतिवृष्टीनंतर यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर वाणू अळीचा प्रादुर्भाव, सोयाबीनसह – ABP Majha

Written by

By: निलेश फाळके | Updated at : 25 Sep 2022 06:51 AM (IST)
Edited By: गणेश लटके
Agriculture News,
Yavatmal Agriculture News : राज्यात सध्या पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच काही भागात शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत. दरम्यान, अशातच आता अतिवृष्टीनंतर यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील सोयाबीन, कापूस, तूर, मिरची या पिकांवर वाणू अळीचे (Millipede) संकट आलं आहे. या वाणू अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
अतिवृष्टीने आधीच शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पिक जगवण्यासाठी  शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. अशातच आता वाणू किडीने सोयाबीन पिकावर आक्रमण केलं आहे. त्यानंतर मिरची पिकावर देखील वाणू किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आर्णी तालुक्यातील कोपेश्वर येथील 50 एकर शेती त्यामुळं उध्वस्त झाली आहे. या खरीप हंगामात शेतकरी अतिवृष्टीमुळं संकटात सापडले आहेत. दुबार तिबार पेरणीनंतर शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्न पडेल याची शाश्वती नाही. त्यातच विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या आर्णी तालुक्यातील कापेश्वर येथे तूर, सोयाबीन, मिरची पिकावर गोगलगाय, वाणू अळीने आक्रमण केले आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊनही त्यांनी दखल घेतली नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. दरम्यान, मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.


वाणू अळीच्या प्रादुर्भावाबाबत आम्ही कृषी अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. अद्याप अधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. तसेच तहसीलदार यांनी देखील याबाबत माहिती दिली आहे. मात्र, त्यांनी आमच्याकडे याबाबतचे काही काम नसल्याचे त्यांनी सांगितले.  शेतीचे काम हे कृषी आयुक्तालयाकडे राहते असे तहसीलर यांनी सांगितल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणार असल्याचे शेतकरी प्रकाश राठोड यांनी सांगितले. तिथेही आमची दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करु असा इशारा देखील यावेळी राठोड यांनी दिली आहे.

गोगलगाय आणि वाणू अळीमुळं मोठ्या प्रमाणात आमच्या शेतीचं नुकसान होत आहे. याकडे कृषी विभागाचे काही लक्ष नसल्याची माहिती शेतकरी बालाजी ठाकरे, यांनी दिली. गोगलगायीचा सोयाबीनसह कापूस तूर पिकावर मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं शासनानं आम्हाला मदत करावी अशी मागणी देखील ठाकरे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Nirmala Sitaraman : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा : सीतारमण
Nandurbar  Agriculture News :  पारंपारिक शेतीला फाटा देत ‘गवती चहा’ची शेती, 250 एकरवर यशस्वी प्रयोग 
Maharashtra Rain : 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान राज्यात पावसाचा अंदाज, विदर्भात यलो अलर्ट
Agriculture News : मान्सून निरोप घेणार! शेतकऱ्यांनी काय नियोजन करावं? कोणत्या पिकांची काढणी करावी?
Maharashtra Monsoon : 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेणार, हवामान विभागाची माहिती
Gondia News : गोंदियामध्ये 120 विद्यार्थ्यांना ट्रकमध्ये कोंबून प्रवास, श्वास गुदमरल्याने काही विद्यार्थी बेशुद्ध
Rules Change from 1st October 2022: एक ऑक्टोबरपासून बँकिंग आणि डिमॅटबाबत नियमात होणार बदल, जाणून घ्या
Deepak Kesarkar on Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे गोबेल्स नीती अवलंबत आहेत, दीपक केसरकरांचा हल्लाबोल 
Petrol Diesel Price: कच्च्चा तेलाच्या दरातील घसरणीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात? जाणून घ्या आजचे दर
Local Railway Mega Block : मुंबईकरांनो, आज लोकल रेल्वेने प्रवास करणार असाल, तर कृपया ही बातमी वाचा

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares