नैनाविरोधात शेतकऱ्यांमध्ये आक्रोश – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
नवीन पनवेल, ता. २ (वार्ताहर) ः नैना क्षेत्रातील आदई येथील अतिक्रमणे तोडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकरी प्रकल्पग्रस्त उत्कर्ष समितीचे सदस्य आणि शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे २३ गावांमध्ये होऊ घातलेल्या नैना प्रकल्पाविरोधातील शेतकऱ्यांचा विरोध कायम असल्याचे अधोरेखित झाले आहे.
पनवेल परिसरात नैनाविरोधी शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने जनजागृती केली जात आहे. याच अनुषंगाने ‘नैना हटाव, शेतकरी बचाव’ ही मोहीमदेखील राबवली जात आहे. अशातच आदई येथील बांधकामांवर शनिवारी (ता. १) कारवाईसाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले आहे. नैनाविरोधी शेतकरी उत्कर्ष समितीच्या सदस्यांनी या कारवाईला प्रखर विरोध केला आहे. या वेळी नैना प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती आणि आदई गावचे सरपंच रमाकांत गरुडे तसेच राजेश केणी सचिव नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
————————————
बैठकांमधून आंदोलनाची रणनीती
या नैनाला शेतकऱ्यांमधून कायम विरोध केला जात आहे. नैनाला विरोध करण्यासाठी यापुढे शेतकरी मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भात शेतकऱ्यांची पनवेल येथील शेकाप कार्यालयात आमदार जयंत पाटील यांच्यासोबत बैठकसुद्धा घेतली आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares