Beed News : बीडमधील 100 ग्रामपंचायतीसमोर शेतकऱ्यांचे आक्रोश आंदोलन पिक विम्याची केली मागणी – ABP Majha

Written by

By: गोविंद शेळके, एबीपी माझा | Updated at : 08 Mar 2022 02:06 PM (IST)
Edited By: श्रीकांत भोसले
Beed News : बीडमधील 100 ग्रामपंचायतीसमोर शेतकऱ्यांचे आक्रोश आंदोलन ; पिक विम्याची केली मागणी
Beed News : पिक विम्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पिक विम्याच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रोश आंदोलन केले. जिल्ह्यातील 100 ग्रामपंचायतींसमोर हे आंदोलन करण्यात आले. मागच्या दोन वर्षात वेगवेगळ्या कारणाने शेतकऱ्याचे नुकसान झाले असतानाही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. त्याच्या निषेधार्थ हे आजचे आक्रोश आंदोलन करण्यात आले. 
सन, 2021 मधील विमा देखील पूर्ण देण्यात आला नाही.  7 लाख 11 हजार पात्र शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांना पिक विम्याची काही रक्कम मागील आठवड्यात देण्यात आली. अद्याप अजूनही 4965 शेतकरी अद्याप पिकविम्यापासून वंचित असल्याचे दावा करण्यात आला आहे. 
धनंजय गुंदेकर यांच्या नेतृत्वाखाली बीड तालुक्यातील 100 गावांमध्ये एकाचवेळी आक्रोश आंदोलन करण्यात आले. या वेळी बीड तालुक्यातील गावा-गावात ग्रामपंचायत समोर तसेच तलाठी कार्यालयासमोर एकत्रित येत शेतकऱ्यांनी सरकार विरोधी घोषणा दिल्या आणि पीक विमा मिळावा अशी मागणी केली.
पिक विम्याचे अर्ज करताना शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यावेळी बराच गोंधळ निर्माण झाला होता. ऑनलाइन-ऑफलाइनच्या गोंधळ सुरू होता. शेवटी शेतकऱ्यांनी स्थानिक प्रशासनचा भाग म्हणून तलाठी ग्रामसेवक यांच्याकडे पिक विम्याचे अर्ज दिले होते. पिक विमा योजनेच्या दाव्याची आठवण करून देण्यासाठी आज ग्रामपंचायत तसेच तलाठी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी हे आक्रोश आंदोलन केलं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha
 

Flower Farmers : पावसामुळं अहमदनगर जिल्ह्यातील फुल शेतीचं नुकसान, सणासुदीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना फटका
Shetkari Sanghatana : साखर आयुक्त ठराविक मंत्र्यांच्या सांगण्यावरून काम करतात, शेतकरी संघटनेच्या पांडुरंग रायतेंचा आरोप
Soyaben News : सोयाबीनच्या दरात घसरण, राजकीय अजेंडा बाजुला ठेऊन शेतकऱ्यांनी चळवळ उभारावी, कृषी अभ्यासक श्रीकांत कुवळेकरांचं आवाहन 
Shetkari Sanghatana : ओतूरला आज कांदा आणि ऊस परिषद, शेतकरी संघटना आक्रमक, ‘या’ आहेत प्रमुख मागण्या 
Wheat Prices : सणासुदीच्या मुहूर्तावर गव्हाला झळाळी, किंमतीत तीन टक्क्यांची वाढ
Andheri east Assembly Election 2022 : अंधेरी पोटनिवडणूक जाहीर; 3 नोव्हेंबरला मतदान, तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी
राज्यात 700 ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार; आरोग्य क्षेत्रासाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या महत्वाच्या घोषणा
Bomb Threat Onboard : इराणहून चीनकडे निघालेल्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी, धमकीनंतर भारतीय वायू दलाकडून विमानाला सुरक्षा
Maoist On PFI Ban: पीएफआयवरील बंदी म्हणजे फॅसिस्ट हिंदुत्ववादी अजेंडा; माओवाद्यांची सरकारवर टीका
Kolkata : दुर्गा देवीचे महिषासूर महात्मा गांधी? कोलकाताच्या दुर्गा पूजा मंडपातील मूर्तीवरून मोठा वाद 

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares