किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त कर्जासह मिळतात अनेक लाभ, जाणून घ्या… – Lokmat

Written by

Lokmat Business
किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त कर्जासह मिळतात अनेक लाभ, जाणून घ्या…
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 02:53 PM2022-03-18T14:53:17+5:302022-03-18T14:56:46+5:30

भारत हा प्राचीन काळापासून कृषीप्रधान देश मानला जातो. देशातील बहुसंख्य लोक अजूनही शेतीतून आपला उदरनिर्वाह करत आहे. देशाच्या जीडीपीमध्ये (GDP) कृषीचे योगदान 17 ते 18 टक्के आहे. अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध योजना आणत असते. त्यापैकी एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड आहे. शेतीचे उत्पादन अनेक गोष्टींवर अवलंबून असते, त्यात हवामान महत्त्वाचे असते.
बऱ्याचदा वादळ, अतिवृष्टीमुळे आलेला पूर इत्यादीमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना अनेकदा कर्ज घ्यावे लागते. शेतकरी अनेकदा त्याच्या आजूबाजूच्या लोकांकडून खूप जास्त व्याजदराने कर्ज घेतात. यानंतर आयुष्यभर त्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून राहतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड सुरू केले आहे. किसान क्रेडिट कार्ड योजना 1998 मध्ये सुरू झाली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज मिळण्याची तरतूद आहे. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
किसान क्रेडिट कार्डचे फायदे… 
किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना कमी व्याजदराने 3 लाखांपर्यंत कर्ज देते. हे कर्ज केवळ 4 टक्के व्याजदराने दिले जाते. या कार्डचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच, जास्तीत जास्त 75 वर्षांचे शेतकरी या क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतात.
किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे…
– मतदार ओळखपत्र
– आधार कार्ड
– ड्राइव्हिंग लायसन्स
– पासपोर्ट
– शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे
किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याची पद्धत…
किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज करू शकता. बँकेत गेल्यानंतर किसान क्रेडिट कार्डचा अर्ज भरा. यानंतर तुम्हाला वर दिलेली सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील. यानंतर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळेल. याशिवाय, तुम्ही बँकांच्या अधिकृत वेबसाइटद्वारेकिसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकता.
 
Credit Card वरून पैसे काढायच्या विचारात आहात? त्यापूर्वी जाणून घ्या याचे फायदे-तोटे
10 hours ago
Gold Price Review: सोन्याच्या दरात मोठी वाढ, दिवाळीपर्यंत आणखी महाग होऊ शकतं सोनं
14 hours ago
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम! PM मोदीनींही केली आहे गुंतवणूक, तुम्हीही घेऊ शकता फायदा
1 day ago
State Bank चे ग्राहक आहात? या प्रोसेसशिवाय ATM मधून पैसे काढता येणार नाहीत
1 day ago
फेस्टिव्हल सिझनमध्ये Jioच्या ग्राहकांची बल्ले बल्ले, मिळतोय ४५०० चा लाभ, असा घ्या फायदा
2 days ago
अरे व्वा! पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये फक्त 95 रुपये गुंतवा आणि तब्बल 14 लाख रिटर्न मिळवा
2 days ago
SIP Calculator: आपली SIP सुरू करण्याची इच्छा आहे? बम्पर नफा मिळविण्यासाठी जाणून घ्या, हे 5 खास 'गुरु मंत्र'
2 days ago
डेबिट आणि क्रेडिट कार्डला कसं कराल टोकनाईज? पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस
2 days ago
ज्येष्ठ नागरिकांसाठी १ ऑक्टोबरपासून सुरू झाली महत्वाची सुविधा, बँकेचं काम घरबसल्या होणार!
3 days ago
बोनस शेअर मिळताच 1 लाखाचे झाले 71.61 लाख! गुंतवणूकदारांची दिवाळी; मिळाला 7000% परतावा
4 days ago
सामान्य नागरिकांना अर्थसंकल्पाबद्दल काय वाटत आहे? Common People Expectations From The Budget 2021
2nd Feb'21
जुन्या गाड्या भंगारात जाणार | Auto Sector in Budget 2021 | FM Nirmala Sitharaman | India News
1st Feb'21
स्टार्टअपसाठी बूस्टअप नाहीच | No Startup Booster In Budget 2021 | FM Nirmala Sitharaman | India News
1st Feb'21
Live – Union Budget2021 Of India | अर्थसंकल्पातून काय मिळाले?
1st Feb'21
LIVE – Union Budget 2021 | FM Nirmala Sitharaman अर्थसंकल्प सादर करताना थेट प्रक्षेपण
1st Feb'21
पहा काय झालंय स्वस्त – काय महाग? Union Budget 2021-22 | FM Nirmala Sitharaman | India News
1st Feb'21
करदात्यांना काय मिळालं? #Budget2021 | FM Nirmala Sitharaman | What did the Taxpayers Get?
1st Feb'21
अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळाले? What Did the Farmer's Get in the Budget 2021? India News
1st Feb'21
Budget 2021 : बजेट आधीज शेअर बाजार गडगडला, पुढे काय? India News
1st Feb'21
Budget2021Expectations | अर्थमंत्र्यांकडून महिलांच्या खास अपेक्षा काय आहेत? Union Budget Of India
1st Feb'21
Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares