नगरमध्ये 'राष्ट्रवादी'चे रास्ता रोको: शेतकऱ्यांना सरसकट 50 हजारांची मदत करा; माजी आ. राहुल जगतापांची तहसीलद… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
या सरकारने झोपेचे सोंग घेतले असल्याने शेतकऱ्यांना झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलने करावी लागत असल्याचे सांगत. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करायची असेल तर सरसकट पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी माजी आमदार राहुल जगताप यांनी केली.
एक तास आंदोलन
शेतकऱ्यांच्या शेतातील हातातोंडाला आलेली पिके सडून गेली असून उर्वरित पिके देखील डोळ्यादेखत खराब होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी सदृश पाऊस झाला आहे. या अकाली संकटामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने त्यांना नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट पन्नास हजार रुपये एकरी नुकसान भरपाई मिळावी. यासाठी राष्ट्रवादीने कोळगाव येथे नगर दौंड महामार्गावर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी आमदार राहुल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, बाळासाहेब नलगे, हेमंत नलगे, अमित लगड, दादासाहेब निर्फळ यांची भाषणे झाली. यावेळी कल्याण जगताप, मच्छिंद्र नलगे, विजय नलगे, विश्वास थोरात, नितीन डूबल,वसंत जगताप, नितीन मोहारे, दादासाहेब निर्फळ, कोळगाव ग्रामपंचायत आजी माजी पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर डोळे झाक
सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीला धाऊन यायला पाहिजे होत. महविकास आघाडीचे सरकार काम करत असताना शेतकऱ्यांवर काही आपत्ती आली तर ते शेतकऱ्यांना मदतीचा हात देत त्यांना मदत करत होते मात्र या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर डोळे झाक केली असल्याची टीका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी करत येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पालकमंत्री झाले मौनी बाबा
दिवाळी तोंडावर असताना शेतीमालाचे नुकसान झाले असल्याने दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. शासनाने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करत देशाचे सरकार खाणाऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांचे नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्ह्याचे पालकमंत्री मौनी बाबा झाले असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शेलार यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares