लक्षदिप हे उजळले घरी…आली दिवाळी!! जाणून घेऊया दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व | Diwali 2022 – Lokshahi News

Written by

हिंदू पंचांगानुसार, दिवाळीचा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो.दिवाळी (Diwali 2022) हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. दिवाळीच्या सणाला लक्ष्मीजीची विशेष पूजा केली जाते. असे मानले जाते की दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी जीची पूजा केल्याने जीवनात कीर्ती आणि वैभव टिकून राहते आणि जीवनात पैशाची कमतरता दूर होते. मात्र दिवाळी हा सण पाच दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. 
वसुबारस :-
दिवाळीच्या पहिल्या दिवशी येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो.यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते.समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते.संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे.यावर्षी २१ ऑक्टोबरला वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात झाली.
धनत्रयोदशी :-
कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीपासून दीपावलीचा मोठा सण सुरू होतो. या दिवशी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशीला संपत्तीची देवता कुबेर, यम आणि औषधाची देवता धन्वंतरी यांची पूजा करण्याचा प्रथा आहे. यंदा धनत्रयोदशीचा सण शनिवार २३ ऑक्टोबरला साजरा होणार आहे रोजी साजरा होणार आहे.
नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन :-
नरकचतुर्दशीला छोटी दीपावली असेही म्हणतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध केला, म्हणून या दिवसाला नरकचतुर्दशी म्हणतात. तसेच दीपावलीच्या पाच दिवसांच्या सणातील सर्वात महत्त्वाचा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. दिवाळीत गणेश-लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे यालाच लक्ष्मीपूजन म्हणतात. यासोबतच हा दिवस लंकेच्या विजयानंतर रामाच्या अयोध्येत परतल्याचा सण म्हणूनही साजरा केला जातो. यंदा नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन सण सोमवार २४ ऑक्टोबरला रोजी साजरा होणार आहे.
बलिप्रतिपदा/पाडवा :-
हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे.बलिप्रतिपदेतला बळिराजा हा शेतकरी राजा होता. त्याला तिन पावले जमिन दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने मारले. हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचं राज्य अजूनही यावं यासाठी ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात “इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो” अशी म्हण रूढ आहे.घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.यंदा पाडव्याचा सण २६ ऑक्टोबरला साजरा होणार आहे
भाऊबीज:-
भाऊबीज हा भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो.या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात.  या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते त्याला प्रेमाचा टिळा लावते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो.यंदा भाऊबीज हा सण २६ ऑक्टोबरला साजरा होणार आहे रोजी साजरा होणार आहे.

Copyright © Lokshahi News
Copyright © Lokshahi News
Login to your account below
Please enter your username or email address to reset your password.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares