Cow farming tax on farmers: बाब्बो अवघडच की..! गाईच्या 'त्या' कृतीवरही मोठा कर..! शेतकरी आक्रमक – Krushirang

Written by

Get the latest creative news from FooBar about art, design and business.Cow farming tax on farmers: दिल्ली (Delhi): नागरिक आणि मग त्यात समाविष्ट असलेले शेतकरीही कर वसूल करायचे महत्वाचे साधन असल्याचे कोणत्याही सरकारला वाटते. मग ते महाराष्ट्र सरकार असो की भारत सरकार (Maharashtra government or Indian government). पण जगभरातील इतर देशही यास अपवाद नाहीत. कारण, एका देशाने चक्क पशुपालक शेतकऱ्यांना गाईच्या ढेकर देण्यावर कराची (levy a tax on cow’s burp to cattle rearing farmers) आकारणी करण्याची तयारी केली आहे. कुठे सिरिया, अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानात (Syria, Afghanistan or Pakistan) असे घडलेले नाही. तर, तुलनेने विकसित मानल्या जाणाऱ्या देशाने असा कायदा करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी असलेले कारण अनेकांना चक्रावून टाकत आहे.
आपल्याकडे पंजाब राज्यात शेतकरी आंदोलन करत असतानाच तिकडे न्यूझीलंडमध्ये (Farmers took to the streets in New Zealand) गुरुवारी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. सरकारच्या नव्या नियमांना त्यांनी विरोध दर्शवला आहे. गायी ढेकर देणे आणि इतर हरितगृह वायू उत्सर्जनाच्या काही कृतींवर कर (government’s plan to tax cow burping and other greenhouse gas emissions) लावण्याच्या सरकारच्या योजनेच्या निषेधार्थ ते सर्व रस्त्यावर उतरले. मात्र, हे मोर्चे अपेक्षेइतके मोठे नव्हते. ‘ग्राउंड्सवेल न्यूझीलंड’ समूहाच्या मदतीने देशभरातील गावे आणि शहरांमध्ये 50 हून अधिक ठिकाणी यासाठी निदर्शने करण्यात आली. मागील आठवड्यात सरकारने हवामान बदलाचा सामना करण्याच्या (new agriculture tax as part of its plan to tackle climate change) योजनेचा एक भाग म्हणून नवीन कृषी कर प्रस्तावित केला. त्यात शेणखतावर कर लावण्याच्या योजनेचाही समावेश आहे. गायींच्या शेणामुळे मिथेन वायू बाहेर पडतो, ज्यामुळे प्रदूषण पसरते. न्यूझीलंडमधील पशुपालन मुख्यतः शेतीशी संबंधित आहे. देशाची लोकसंख्या सुमारे 50 लाख आहे. परंतु येथे त्या तुलनेत एक कोटीपेक्षा जास्त गायी-म्हशी (cows and buffaloes) आणि 26 कोटी मेंढ्या आहेत.
Im journalist in pune city.
Banking News : आयसीआयसीआय (ICICI Bank) बँकेचे दुसऱ्या तिमाहीचे (Second Quarter) निकाल (Result) जाहीर झाले…
Get the latest creative news from SmartMag about art & design.Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares