आंदोलन: अतिवृष्टीतील नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
अंबड तालुक्यातील सुखापुरी, गोंदी व वडीगोद्री महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे खरिपातील पिके व फळपिकांची फळगळ होऊन प्रचंड मोठे नुकसान झाल्याने सरसगट नुकसान भरपाई मिळावी यासह अन्य मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धाकलगाव येथे एक तास रस्ता रोको आंदोलन केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात करण्यात आली. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्यासह युवा नेते विष्णू नाझरकर, ज्येष्ठ नेते अर्जुन शेडगे, माजी सरपंच विजय नाझरकर, राजू पवार आदींनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी आघाडीचे गणेश गावडे, मुन्नाभाई पठाण, राजू पवार, पांडुरंग गटकळ, बप्पासाहेब काळे,अंकुश तारख, बाबासाहेब दखणे, राजेंद्र शेडगे, शिवाजी शेवाळे, भारत उंडे, मनोज शिर्के, किशोर हातोटे, गजानन नांद्रे, भागवत नांद्रे, बालू शिंदे, भानुदास प्रधान, प्रल्हाद मरकड, अजय रसाळ, शिवदास गाडेकर, हरी कवडे,अजय काळे, सचिन चोरमले, अजय गावडे, शरद पावसे, दिपक झेंडे, बंडू शिंगटे, विजय लहाने, मंगेश लहाने यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
महसूल चे मंडळ अधिकारी रुईकर, एचडीएफसी अर्गो वीमा जिल्हा समन्वयक आरिफ शेख, कृषी पर्यवेक्षक कल्याण शिंदे, सपोनि सुभाष सानप यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सरपंच बळीराम शेडगे, रामेश्वर घिगे, रामेश्वर लहाने, दिपक नांद्रे, राजु शेख, अरुण बांगर, महारुद्र केकान, तान्हाजी धुमाळ, गोरख कोल्हे, राजू उंडे, सतीश ढोणे, बाळासाहेब नाझरकर, साळीकराम बाळसराफ, उमेश पाष्टे, गोपाल खोमणे आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष सानप, कल्याण आटोळे, पगारे, वाघमारे, महेश तोटे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares