आंदोलन: युवा शेतकरी संघर्ष समितीचा मोर्चा ; शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने शुक्रवारी परतूर उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. रेल्वे गेट ते उपविभागीय कार्यालय परतुर पर्यंत वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या.परतूर आणि मंठा परिसरामध्ये यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. सोयाबीन कापूस उध्वस्त झाले, सोयाबीनला कोंब फुटला आहे. तर कापसाच्या वाती झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत शासन पंचनामे आणि ई पीक पाहणीवर अडून बसलेले आहे.
ई तक्रार, ई पाहणी, पंचनामे असतील हे गौड बंगाल बंद करून तत्काळ सरसकट शेतकऱ्यांना दुष्काळी मदत जाहीर झाली पाहिजे, पिक विमा ८० टक्के च्या प्रमाणामध्ये मिळाला पाहिजे, लोणी सावंगी बंधाऱ्याच्या बॅक वॉटर पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी तात्काळ संपादित करून मावेजा देण्यात यावा, निम्न दुधना प्रकल्पाच्या अतिरिक्त बॅक वॉटर मुळे पाण्याखाली गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून तत्काळ मावेजा देण्यात यावा व एक रकमी उसाला भाव मिळाला पाहिजे आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares