राजकारण: जलजीवन मिशनची घोषणा झाली, त्यावेळी तेआमदारही नव्हते; खासदार सुजय विखे यांचा माजी मंत्री प्राजक्त त… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये प्रत्येकाच्या घरी नळाने पाणी देणार अशी घोषणा केली होती. तेंव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. पण तेंव्हा विद्यमान व्यक्ती तालुक्यात आमदारही नव्हते, असा टोला खासदार सुजय विखे यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना नाव न घेता लगावला. तसेच अडीच वर्षात कार्यकर्त्यांना जेवढा त्रास झाला, तो पुढील दीड वर्षात सुतसमेत वसूल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर, ४० कोटींच्या पाणी योजनेचे भुमीपुजन खासदार सुजय विखे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार शिवाजी कर्डिले होते. यावेळी अॅड. सुभाष पाटील, राहुरी कारखान्याचे चेअरमन नामेदव ढोकणे, माजी चेअरमन उदयसिंह पाटील, तहसीलदार एफ. आर. शेख, सरपंच किरण ससाणे, संजय नागदे, राधेशाम पटारे, राजेंद्र पटारे, सुखदेव कुसमुडे आदी उपस्थित होते.
विखे म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री कै. बाळासाहेब विखेंपासून आतापर्यंत झालेल्या विकास कामांचे श्रेय अॅड. सुभाष पाटील यांचे आहे. तुम्ही आमदार आहात, भूमिपूजन करायचे असेल तर करा, पण मागच्या फ्लेक्सवर नरेंद्र मोदींचा फोटो असलाच पाहिजे, असाही सल्ला खासदार विखे यांनी दिला. कर्डिले म्हणाले, राहुरी कारखाना तुम्हाला चालवायचा असेल, तर तुम्ही मला फक्त एक अर्ज द्या, मी बँकेकडून कारखाना चालवण्याची परवानगी देतो.
निवडणूक न लढता चालवायला घेऊन चालवून दाखवा. अॅड. सुभाष पाटील म्हणाले, खाताळ पाटील व खासदार बाळासाहेब विखे यांनी तुमच्या पाण्याचा विषय खांद्यावर घेतल्याचे सांगितले होते. १९७१ मध्ये खताळ पाटील पालकमंत्री असताना वांबोरीला पाणी योजना मंजूर झाली. आता ५० वर्षांनी त्यांचा नातू खासदार असून, या योजनेचे भूमिपूजन खासदार बाळासाहेब विखे यांच्या नातवाच्या हस्ते होते हा योगायोग आहे. ते हयात नसले तरी त्यांचा विचार नातवाच्या रूपाने अजूनही आहे,.म्हणूनच बाळासाहेब विखेंचे तैलचित्र इथे लावले, हे सांगताना अॅड. पाटील भाऊक झाले.
माझा बाप मटका खेळत नव्हता
माझे वडील १२ वर्षे संत गाडगेबाबांच्या सहवासात होते. म्हणून त्यांना बाप म्हणायला अभिमानच वाटतो. माझा बाप काही मटका खेळत नव्हता. माझा बाप एसटी स्टँडवर झोपला नाही. ज्यांना स्वत:च्या बापाची लाज वाटते त्यांच त्यांनी पहावं त्यांच आमचा विचार करू नये, असे खडे बोल अॅड. सुभाष पाटलांनी टिकाकारांना सुनावले.
डिपीडीसी निधी कर्जत, जामखेड, पारनेरला दिला
जिल्ह्याच्या राजकारणात एवढे सुडाचे राजकारण मी कधीच पाहिले नाही. एखादा व्यक्ती आमदार होऊन मंत्री होतो आणि भाजप व विखेंचे कार्यकर्ते कसे संपवता येतील, यासाठी अडीच वर्षे राहुरी तालुक्यात सत्ता राबवतो. तर डिपीडीसीचा निधी केवळ कर्जत, जामखेड व पारनेरला नेऊन घातला, असा टोलाही खासदार विखे यांनी मविआ नेत्यांना लगावला.
“त्यांना’ कारखाना चालवायला द्या
राहुरी तालुक्याची कामधेनू वाचवण्यासाठी आज जे पुढाकार घेत आहेत. शेतकरी संघटना सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी लढते, आपण हा कारखाना त्यांच्याकडे सुपूर्त करून त्यांना संधी द्यावी. आंदोलन करण्याची गरज नाही, जो नियम आम्हाला होता, तोच नियम लावून त्यांना कारखाना चालवायला द्या, असेही खासदार विखे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares