शेतकरी कर्जमुक्ती योजना: 55 हजार शेतकऱ्यांना 200 कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्ज भरणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे ५५ हजार शेतकऱ्यांना २०० कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान गुरुवारी बँक खात्यावर जमा झाले. नियमित कर्जदार शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान अखेर जमा झाल्याने त्यांची दिवाळी गोड झाली आहे. तसेच जिल्ह्यातील अद्यापही एक लाख नियमित कर्जदार शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित असून दिवाळीनंतर त्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेची अंमलबजावणी केली होती. पहिल्यांदा दोन लाखांपर्यंत थकीत कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती.
नियमित शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडल्याबद्दल राज्याच्या विविध भागांत संघटनांनी आंदोलन केले होते. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची वाढती नाराजी लक्षात घेता नियमित कर्जदारांनाही अनुदान देण्याचे जाहीर केले होते. शासनाने नियमित कर्जदारांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान योजनेची अंमलबजावणी सुरू केली. मार्च महिन्यात सादर केलेल्या अंदाजपत्रकात नियमित कर्जदारांसाठी प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी तरतूद केली होती. मात्र त्याबाबतची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष झाले होते.राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर नियमित कर्जदार शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रोत्साहन अनुदान दिले आहे. जिल्ह्यातील नियमित कर्ज भरणाऱ्या एक लाख ६० हजार ७९५ खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares