Breaking News 23 October 2022 Latest Update : पाकिस्तानचं भारतासमोर 160 धावांचं आव्हान – Times Now Marathi

Written by

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

टी-20 विश्वचषकातील भारताच्या पहिल्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर अत्यंत अटीतटीच्या सामन्यात 4 गडी राखून प्रचंड मोठा विजय मिळवला. या विजयाचा खरा शिल्पकार हा विराट कोहलीच ठरला. कारण विराटने 53 चेंडूत 82 धावा करत टीम इंडियाला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला.  
टी-20 विश्वचषक: भारत  वि. पाकिस्तान: नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानी संघाने 20 ओव्हरमध्ये 159 धावा केल्या आहेत. यावेळी पाकिस्तानच्या तळाच्या फलंदाजांनी चांगली फटकेबाजी करत भारतासमोर 160 धावांचं आव्हान दिलं आहे. भारतीय गोलंदाजांनी देखील या सामन्यात समाधानकारक गोलंदाजी करत पाकिस्तानची धावसंख्या फार मोठी होणार नाही याची काळजी घेतली.    
चांदवड – मुंबई आग्रारोडवर राहुड घाटात दुपारी तीन वाहने एकमेकावर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात १४ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ८ जण गंभीर जखमी आहेत तर सहा जण किरकोळ जखमी आहे . यात ट्रक, कार व ऑटो रिक्षा ही तिनही वाहने चांदवड कडून धुळ्याकडे जात असतांना ट्रक उलटला, त्यापाठोपाठ कार व रिक्षा उलटून तीनही वाहनातील सुमारे १४ जण जखमी झाले. त्यांना सोमा टोल कंपनीच्या गस्ती पथक व रुग्णवाहिकेतून मदतकार्य करुन चांदवड उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
नाशिकमध्ये राहुड घाटात अपघात, १४ जण जखमी
वाचा सविस्तरhttps://t.co/dVJBHbm4Nc pic.twitter.com/PPLi3IYr6f
नाशिकमधील येवला शहरातील महाराणा प्रताप पुतळ्या समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये दिवे लावत येथील स्थानिक नागरिकांनी आपली दिवाळी साजरी करून नगरपालिका प्रशासनाविरोधात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले आहे. गेल्या तीन वर्षापासून रस्त्याची दुरावस्था झाली असून वेळोवेळी रस्ता तयार करून देण्याची मागणी केली असून प्रशासन सर्रास दुर्लक्ष केल्याने येथील रहिवाशांनी गांधीगिरी पद्धतीने खड्ड्यांमध्ये दिवे लावत आपली दीपावली साजरी केली आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. 
नाशिकमध्ये खड्ड्यात दिवे लावून केली दिवाळी साजरी, नगरपालिकेविरोधात महिलांचा संताप pic.twitter.com/98lo2k7K6z
पाकिस्तानला पहिला धक्का. अर्शदिप सिंहने पहिली विकेट घेतली. कर्णधार बाबर आझम शून्यवर आऊट
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना: भारताने टॉस जिंकला. भारतानं पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला.
शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीचे सहा निर्णय रद्द केले आहे. त्यात आरे कारशेडला मंजूरी आणि सीबीआयला पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश अशा निर्णयांचा समावेश आहे. 
Eknath Shinde-BJP govt in Maharashtra has stayed or reversed at least half-a-dozen decisions taken by previous Maha Vikas Aghadi (MVA) regime, including shifting of Aarey Metro car shed and restoring general consent to CBI to probe cases in state
पनवेल तालुक्यातील महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे चौकीजवळ एसटी बस उलटली आहे. या अपघातात १० प्रवासी जखमी झालेत आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 
ठाणे सांगली बस क्रमांक एम एच 40 एन 9164 गंभीर अपघात होऊन भरलेली बस रस्त्याच्या बाजूला उलटली आहे. कोण पुलावरून महामार्गावर जाणार वळण घेत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरून खाली झाडांमध्ये उलटली. बस प्रवाशांनी खच्चून भरली होती. दिवाळी सणासाठी चाकरमानी मुंबईहून गावी जाण्यासाठी या बस मधून प्रवास करत होते. या बसमधून तब्बल 46 प्रवासी होते. अपघातानंतर सर्व प्रवासी बस मध्येच अडकून पडले होते.  पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, बसच्या पाठीमागील काचा फोडून प्रवासी तसेच त्यांचे सामान बाहेर काढण्यात आले या अपघातात आठ ते दहा प्रवासी जखमी झाले आहेत, तसेच बस चालकही गंभीर जखमी असून त्याच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे.  जखमी प्रवाशांना उपचारासाठी आयआरबी रुग्णवाहिकेने एमजीएम कळंबोलीतील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.  
मुंबई गोवा महामार्गावर एसटी उलटली,10 प्रवासी जखमी
सविस्तर वृत्त https://t.co/dVJBHbm4Nc pic.twitter.com/IaOGmvyjrX
अभिनेता प्रभासचा आज वाढदिवस आहे. प्रभासचं पूर्ण नाव प्रभास राजु उप्पालापाटी असं आहे. त्याचा जन्म 23 ऑक्टोबर 1979 रोजी चेन्नई येथे झाला.
आंध्र प्रदेशमध्ये फटाकांच्या दुकानाला आग लागली आहे. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 
Andhra Pradesh | Fire broke out in a firecracker stall setup in Gymkhana ground at Gandhi Nagar, Vijayawada, today morning. pic.twitter.com/jKJRObHgCw
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात जवळगाव, हिंगणी आणि ढाळे पिंपळगाव प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत.धरण क्षेत्र परिसरात अतिवृष्टीत होऊन नागझरी, भोगावती,राम आणि नीलकंठा नद्यांची पात्रे भरून वाहत आहेत. काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.सोयाबीन, कांदा, द्राक्ष, मका पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. या नद्यांवरील ढाळे पिंपळगाव मध्यम प्रकल्प, बार्शीच्या पूर्व दिशेला असलेला हिंगणी मध्यम प्रकल्प आणि जवळगाव मध्यम प्रकल्प हे दोन्ही प्रकल्प वैरागपासून जवळ आहेत. हिंगणी मध्यम प्रकल्प तीन दिवसांपासून पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहे. अनेक ठिकाणी शेतातील माती वाहून गेली आहे. सोयाबीनचे उभे पीक काळे पडून मातीमोल झाले आहे. छाटणी केलेल्या द्राक्ष बागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. सतत पडणार्‍या पावसाने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. 
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' आज कर्नाटकातील रायचूर ते तेलंगणातील गुडेबेलूरमध्ये दाखल होणार आहे. तेलंगणात ही पदयात्रा महबूबनगरमधील गुडेबेलूर येथून सुरू होईल. कर्नाटक-तेलंगण सीमेवर या पदयात्रेच्या भव्य स्वागतासाठी काँग्रेसच्या तेलंगणा युनिटने सर्व तयारी केली आहे.
शी जिनपिंग आता तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. पण त्यांच्या शपथविधीमुळे चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू शकतं. चीनची राजधानी बीजिंगसह अतिसंवेदनशील शहरांमध्ये प्रत्येक 100 फुटांवर एक पीएलए जवान तैनात आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिवाळीच्या पूर्वसंध्येला अयोध्येला भेट देणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या जागेची पाहणी करतील. त्यांना भगवान श्री रामलला विराजमान यांचे दर्शन व पूजा करतील. यानंतर प्रतिकात्मक भगवान श्री राम यांचा राज्याभिषेक होईल.
जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेतून हकालपट्टी
चंद्रपूर जिल्ह्यातील वटराणा येथे शोष खड्डा खोदताना दोन चांदीची नाणी सापडली. या नाण्यांवर फारसी भाषेत कलमा कोरल्या असून ही नाणी मुघल बादशाह अकबर आणि औरंगजेबाची आहेत. 
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्या दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दिपाली सय्यद या एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी  दिपाली सय्यद म्हणाल्या की, मी अनेकदा उद्धव ठाकरेंना भेटायला प्रयत्न केला. मात्र माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू दिला नाही. मातोश्रीतील त्यांच्या जवळच्या काही लोकांनी माझा आवाज दाबल्याची खदखद त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मनसेनं भविष्यात शिंदे-फडणवीसांसोबत युती करायला हरकत नाही-आमदार राजू पाटील
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरो  (ISRO)ने शनिवारी रात्री 12:07 वाजता आपल्या सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण केले. ISRO चे  रॉकेट LVM-3 आकाशाकडे झेपावल्यामुळे भारताने ग्लोबल कमर्शियल लॉन्च मार्केटमध्ये एक नवीन इतिहास रचला आहे. 

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares