Buldhana : शेतकऱ्यांना मदत पण…, शिंदे गटाच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर; खाणार चटणी-भाकर – Times Now Marathi

Written by

बुलढाणा : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यावर ओढावलेले संकट मुळे शेतकऱ्याची दिवाळी यंदा अंधारात साजरी होत आहे. शेतकऱ्यांच्या वेदनाची जाणीव असल्याने शेतकऱ्यांना आधार देत त्यांच्या पाठीशी आपण आहोत, त्यामुळे आपणही यंदाची दिवाळी साजरी करणार नाही, अशी भूमिका शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी घेतली आहे (MLAs of Shinde group will protest on Diwali day)
राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून, शेतकरी मोठ्या  संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मका आदी खातातोंंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अद्याप अनेक ठिकाणी पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांनी भरपाई मिळू शकली नाही.
यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सोमवारी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची भूमिका जाहीर केली केले. गायकवाड म्हणाले, सातत्याने तिसऱ्या वर्षी शेतकऱ्याची दिवाळी साजरी होत नसल्याने शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव ठेवून या पोशिंदाच्या पाठीमागे आपण आहोत. दीपावलीच्या दिवशी आपण कोणत्याही प्रकारचा दिवा लावणार नाही. दिवाळीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर खाणार असल्याचे आमदार गायकवाड यांनी सांगितले. 

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares