Mahabaleshwar : डोळ्यांदेखत समद वाहून गेलं; मुसळधार पावसामुळं स्ट्रॉबेरीचं मोठं नुकसान; शेतकरी रडकुंडीला – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
मुसळधार पावसानं स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे.
भिलार (सातारा) : पाचगणी परिसरात रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसानं स्ट्रॉबेरी (Strawberry) उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं असून, पावसाच्या या अस्मानी संकटानं स्ट्रॉबेरी शेती (Strawberry Farming) पूर्णपणे पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांपुढं मोठं संकट उभं ठाकलं आहे. याचबरोबर वाटाणा आणि बटाटा पीक हातचे गेल्याने शेतकरी आर्थिक चिंतेत सापडला आहे.
परतीच्या पावसाने स्ट्रॉबेरी उत्पादकांना मोठा फटका बसला असून, सततच्या पावसाने अगोदरच शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीची लागवड करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. काही शेतकऱ्यांनी अद्याप लागवड केली नाही. बऱ्याचदा दिवाळीत स्ट्रॉबेरी विक्रीचा प्रारंभ अनेक शेतकरी करतात; परंतु यंदा पावसामुळे लागवड उशिरा झाली अजूनही काही शेतकरी लागवड करीत आहेत.
हेही वाचा: BJP : समस्या सांगायला गेलेल्या महिलेला भाजप नेत्यानं भरकार्यक्रमात थोबाडलं; संतापजनक Video Viral
काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain In Mahabaleshwar) या स्ट्रॉबेरी शेतात पाणी साचल्याने रोपांना रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. भिलार, गुरेघर, भोसे, खिंगर, राजपुरी, आंब्रळ, मेटगुताड, पांगारी परिसरात स्ट्रॉबेरी शेतीत पाणी साचलेने शेतकरी आर्थिक संकटात हंगामापूर्वीच सापडले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
हेही वाचा: VIDEO : प्रवचन देताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका; लोक म्हणाले, असा मृत्यू करोडोंमध्ये एकालाच मिळतो!
दरम्यान, खिंगर, गोडवली गावातील पिकांच्या नुकसानीची जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी पाहणी केली. या वेळी खिंगरचे उपसरपंच विठ्ठल दुधाणे, अशोक दुधाणे, शंकरराव कळंबे, सुभाष कासुर्डे व शेतकरी उपस्थित होते. या वेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी राजेंद्र राजपुरे यांनी केली आहे. गोडवली येथील नितीन मालुसरे यांच्या शेतीच्या वरच्या बाजूला असणाऱ्या बंगल्याची संरक्षक भिंत पाण्याने कोसळून सर्व पाणी शेतात घुसले. त्यामुळे मालुसरे यांच्या स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares