Maharashtra News Updates: Live Marathi News, CBI ला राज्यात चौकशीसाà – Zee २४ तास

Written by

21 Oct 2022, 23:16 वाजता
Fadanvis on BMC:  ‘पुढच्या दिवाळीपूर्वी मुंबईत भाजप आणि युतीची सत्ता’, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं विधान, लोकांची मनं जिंकली की मतंही मिळवता येतात-फडणवीस, मुंबई महापालिकेत आपलं सरकार येणार-फडणवीस.
21 Oct 2022, 18:35 वाजता
MNS Deepotsav: शिवाजी पार्कवर मनसेच्या दीपोत्सवाला शिंदे-फडणवीसांची हजेरी, प्रथमच शिंदे-फडणवीस-राज ठाकरे एकत्र, मुंबई महापालिकेसाठी नवी ‘महायुती’?
21 Oct 2022, 18:15 वाजता
MNS Deepotsav: शिवाजी पार्कवर मनसेच्या दीपोत्सवाला शिंदे-फडणवीस येणार, प्रथमच शिंदे-फडणवीस-राज ठाकरे एकत्र, मुंबई महापालिकेसाठी नवी ‘महायुती’?
21 Oct 2022, 17:59 वाजता
Thane Firing: ठाण्यात गँगवॉरचा भडका, गुंड गण्या काळ्यावर येऊरच्या जंगलात गोळीबार, घंटाळी परिसरात भरवस्तीत दिवसाढवळ्या गोळीबार, दोषींवर कारवाईची बावनकुळेंची मागणी.
21 Oct 2022, 17:27 वाजता
Jitendra Awhad’s difficulties Increase: जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणींमध्ये वाढ, मारहाणप्रकरणी आनंद करमुसेंची आव्हाड यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, 25 नोव्हेंबरला होणार सुनावणी.
21 Oct 2022, 15:18 वाजता
Jalna Farmer : जालन्यात पिकांत साचलेल्या पाण्यात बसून स्वाभिमानींचं आंदोलन, पिकांच्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी आंदोलन, शेतकऱ्यांना एकरी 50 हजार भरपाई देण्याची मागणी, आंदोलकांची कृषिमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी, स्वाभिमानींचं पिकांत साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन.
 
21 Oct 2022, 15:05 वाजता
Anil Deshmukh : अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला, सीबीआय केसमध्ये देशमुखांचा जामीन फेटाळला. 
 
21 Oct 2022, 14:21 वाजता
Hingoli Bridge Collapse : मुसळधार पावसामुळे हिंगोलीतील वसमत-औंढा रोडवर पूल कोसळला, औंढा नागनाथ रस्त्यावरील वाहतूक बंद.
21 Oct 2022, 14:17 वाजता
Jaiparabha Studio : जयप्रभा स्टुडिओ वाचविण्यासाठी चित्रपट व्यावसायिकांचं आत्मदहन आंदोलन, स्टुडिओसाठी शासन स्तरावर हालचाली होत नसल्यानं आक्रमक.
 
21 Oct 2022, 13:53 वाजता
Sanjay Raut : संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढला, राऊतांच्या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबरला सुनावणी, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत कोठडीत. 
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares