अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान: आसूड घेऊन आंदोलन करण्यास भाग पाडू नका; जयाजीराव सूर्यवंशींचा सरकारला इशारा – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
जिल्ह्यात ऑक्टोबरमधील पावसाने दाणादण उडून दिली आहे. 200 ते 800 टक्के पाऊस पडण्याचा विक्रम झाला आहे. अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आम्हाला आसूड घेऊनच बाहेर पडावा लागेल. तसे आंदोलन करण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये, असा इशारा शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी दिला आहे. शेतकऱ्यांचे हाती यंदा काहीच आले नसल्याने त्यांची दिवाळी काळी जाणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने अंत पाहू नये
सरकारने शेतकऱ्याचा अंत पाहू नये आमची सहनशीलता संपली आहे. तुम्हाला ठिकान्यावर आनन्यासाठी आसुड घ्यावच लागणार आहे . सरकारचे धोरण शेतकऱ्याचे मरण झाले . सरकार कोणतेही असूद्या मरण आमच्या पाचवीला पूजले आहे. सताधारी कधीच शेतकर्यांचा नसतो. सत्तेवर नसल्यावर शेतकर्यांच्या बाजूने उभे राहतो. कोणत्याही राजकीय पक्ष तुमची हाक ऐकणार नाही. तो तुमच्या सरणावर पोळ्या भाजेल हे विसरु नका. राजकरण्याच्या धोरनाचे बळी ठरलेल्या कुटुंबाला भेट देतील. पोराच्या हातात बिस्किटचा पुडा देतील. सौभाग्य गमावलेल्या आमच्या बहिनीच्या हातात सूरतची साड़ी देतील. फोटो काढून निघून जातील. पण मूळ प्रश्न तसाच राहिल. कारण ज्या कर्जबाजारी पणामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केले
तो कर्जाचा डोंगर कोण उतारवणार?
शेतकऱ्यानो उठा राजकरण्याचा ” माज” “उतरवन्यासाठी रस्त्यावर या प्रत्येक गावातील 100 शेतकरी बाहेर पडले तरच तुम्हाला न्याय मिळेल. अन्यथा लिंंबाचे झाड आणि ठिबकची नळी तुमच्यासाठी आहेच. मी स्वस्थ. बसू शकत नाही . खुन्टीवर टांगून ठेवलेला आसुड घेवून बाहेर पडणार आहे. रस्त्यावरच्या लढ़ाई बरोबर शेतकऱ्याना न्याय मिळवून देण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे. तुमचा काय विचार आहे? येताना माझ्याबरोबर शेतकऱ्यांच्या आपल्या हक्काच्या लढ्यासाठी असे आव्हानही जयाजीराव सूर्यवंशी यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares