आंदोलन छेडण्याचा इशारा: तनपुरे यांनी प्रसाद शुगरचे 500 रुपये प्रतिटनप्रमाणे उसाचे पेमेंट करावे ; लांबे – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शेतक-यांची दिशाभूल न करता वांबोरी येथील प्रसाद शुगर कारखान्याच्या गळीत हंगामाचे फायनल पेमेंट ५०० रूपये प्रतिटना प्रमाणे करावे अन्यथा सर्व उस उत्पादक शेतकर्यांना बरोबर घेऊन साखर आयुक्त कार्यलयावर मोर्चा नेऊन चालु गळीत हंगामात प्रसाद शुगरचा क्रेंसिग परवाना रद्द करण्याचे आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार जन शक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात लांबे म्हणाले गेली दोन वर्ष कोरोना लाॅकडाऊन या पाठोपाठ अतिवृष्टीच्या संकटामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. अतिवृष्टी मुळे खरीपातील संपूर्ण पिके जळून गेली आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होऊनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. गळीतास आलेल्या उसाला कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊसाला प्रतिटन ३ हजार रुपये भाव दिला आहे.
नगर जिल्ह्यातील ठरावीक साखर कारखान्यांनी ऊसाला २६०० ते २७०० रूपये प्रतिटन पर्यत भाव दिला,दौंड शुगर कारखान्याने राहुरीतुन १३० किलोमीटर अंतरावरून वाहतूक करुन राहुरीच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २९२५ रुपये तसेच संगमनेर कारखान्याने राहुरीतून १०० किमी वाहतूक करुन २६६० रूपये प्रतिटन बाजारभाव दिवाळीच्या आठ दिवस अगोदर देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
मात्र आमदार प्राजक्त तनपुरे यांचा अधिपत्याखाली असलेला वांबोरी येथील प्रसाद शुगर कारखान्याने उसाचे पहिले पेमेंट २१५० दिले आहेत. प्रसाद शुगरने संगमनेर, संजीवनी,कोळपेवाडी या कारखान्या प्रमाणे आणखी ५०० रूपये प्रतिटन फायनल पेमेंट देऊन इतर साखर कारखान्या प्रमाणे ऊसाला २६५० रूपये बाजारभाव पुर्ण करावा अन्यथा सर्व उस उत्पादक शेतकऱ्यांना बरोबर घेऊन साखर आयुक्त कार्यलयावर मोर्चा नेऊन चालु गळीत हंगामाचा क्रेंसिग परवाना रद्द करण्यासाठी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लांबे यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares