चिन्हांची लढाई बघतोय, शेतकऱ्यांच्या दुःखाची लढाई कोण लढणार, सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला प्रश्न – TV9 Marathi

Written by

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल
Oct 24, 2022 | 2:52 PM
बारामती : राष्ट्रवादीचे नेते आज बांधावर गेले होते. पुरंदर येथे बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, चार-पाच दिवसांपूर्वी संजय जगताप आणि मी संपूर्ण भागाचा दौरा केला. अतिवृष्टीची परिस्थिती बघीतली. या भागात अजितदादा पवार यांच्याशी चर्चा झाली. दोन वर्षे कोविडमध्ये लॉकडाऊनमध्ये होतो. पाऊस खूप आला. दिवाळी साजरी करू शकू की, नाही अशी परिस्थिती आहे. सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. ओला दुष्काळ करा, अशी राज्य सरकारला विनंती करतो.
राज्यात परिस्थिती अतिशय गंभीर आहे. शेतकरी पोटतिडकीनं आपलं म्हणणं मांडताहेत. यवतमाळचा शेतकरी पोटतिडकीने म्हणतोय, चिन्हाची लढाई आम्ही सारखी बघतोय. आमच्या शेतकऱ्याच्या दुःखाची लढाई कोण लढणार. त्यामुळं बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
दोन दिवसांपूर्वी मुलीचा व्हिडीओ बघीतला. मुख्यमंत्र्यांना म्हणते रस्त्यावर उतरून, बांधावर उतरून मदत केली पाहिजे, असं ती मुलगी व्हिडीओत म्हणते. बांधावर काय परिस्थिती आहे, ते बघायला आम्ही आलो आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणा्ल्या, बांधावर गेलो तेव्हा शेतकऱ्यानं साधा फोन दाखविला. शेतकरी म्हणाला, तुम्ही केंद्र सरकारमध्ये आहात. केंद्रानं सगळ्या गोष्टी ऑनलाईन केल्यात. तुम्ही त्याचं कौतुक करता. आमच्यासारख्या लोकांनी काय करायचं. सातबाराचे उतारे ऑनलाईन. मला फोटो काढता येत नाही. ऑनलाईन काही समजत नाही.
मी अन्नधान्याचा प्रश्न सोडवू शकतो. पण, मी काही टेक्नॉलॉजीचा तज्ज्ञ नाही. कधी कधी ते ऑनलाईनचं पोर्टल उघडत नाही.एवढासा तो मोबाईल कधी तो फोटो काढायचा. कधी तो लोड करायचा नि कधी तो पाठवायचा. कधी त्याला न्याय मिळायचा.
अधिकाऱ्यांनो ऑफिसमधून उठा नि बांधावर जा. अतिशय गंभीर परिस्थिती आहे. रोज सातबारासाठी रस्त्यावर उतरा, असं अधिकाऱ्यांना सांगतोय. ऑनलाईनच्या भानगडीत पडू नका, असं सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं.
सोमेश्वर कारखान्याचा आढावा घेतला. एकही उसाचा दांडा शिल्लक राहणार नाही. या परिसरातील घरं बघून सगळ्यांना समाधान वाटलं. सोमेश्वर कारखान्यामुळं दोन पैसे मिळताहेत. सीताफळ, अंजिर, डाळिंब लागवड शेतकरी करतात. पण, यंदा अतिवृष्टीनं सारं नेलं. त्यामुळं शेतकऱ्याला मदत करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 1517
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares