ठेचा भाकर खावून निषेध करणार: स्वाभिमानी शेतकरी पक्ष दिवाळीत करणार आंदोलन – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
स्वाभिमानी शेतकरी पक्ष दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी कार्यालयासमोर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच विविध मागण्यासाठी ठेचा भाकर खावून निषेध करणार आहे. स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील दोन वर्षात कोरोना संकटामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात असताना प्रशासन गांभीर्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत लक्ष देत नाही. तालुक्यात प्रशासनाने सरसकट पंचनामे न करता हेक्टरी ५० हजार रुपये तत्काळ मदत करावी. सन २०२० मधील विम्याची रक्कम राज्य व केंद्र सरकारने पैसे तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. सन २०२२-२३ मधील चालू खरीप हंगामाचा ६५ टक्के पिक नुकसान ग धरून विमा मंजूर करून तत्काळ वितरीत करण्यात यावा.
तसेच राज्य सरकारने जाहीर केलेले अनुदान तत्काळ वाटप करावे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे ५० रुपये हजार रुपयांचे अनुदान तत्काळ वाटप करावे. कृषि उत्पन्न बाजार समितीने नियम डावलून व्यापाऱ्यांचे खासगीतील सोयाबीन खरेदी केंद्र बंद करून कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फतच शेतमालाची खरेदी करावी. या विविध मागण्यांवर तत्काळ कार्यवाही करावी. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.२४ रोजी दीपावलीच्या शुभमुहूर्तावर उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी कार्यालय समोर ठेचा भाकर खावून निषेध करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर तानाजी पाटील, अनिल भोरे, संपत काळे, डॉ. विभिषण भैरट, अमृत भोरे, वेताळ माने, योगेश पाटील, राहूल तांबारे, प्रशांत गोपणे यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares