रत्नागिरीत मंगळवारी रंगणात तेजोमय नादब्रह्म – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
रत्नागिरीत मंगळवारी
रंगणात तेजोमय नादब्रह्म
रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयातर्फे खास दीपावलीनिमित्त सदाबहार गीतांचा तेजोमय नादब्रह्म या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी २५ ऑक्टोबरला केले आहे.सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत ही मैफल वाचनालयाच्या भागोजीशेठ कीर सभागृहात आयोजित केली आहे.
तेजोमय नादब्रह्म या कार्यक्रमात रत्नागिरीतील प्रसिद्ध गायक आनंद पाटणकर, सौ. श्वेता जोगळेकर, अभिजित भट, नरेंद्र रानडे आणि वादक कलाकार हेरंब जोगळेकर, वरद सोहोनी, श्रीरंग जोगळेकर सहभागी होणार आहेत. या मैफलीला जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आणि कार्यकारी मंडळाने केले आहे.

शेतकरी महिलांचे कौतूक
दाभोळ : एकविसाव्या शतकात प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचा सहभागाची कक्षा रूंदावली आहे. अशा स्त्रियांचे समारंभात कौतुक केले जाते. परंतु पिढयानपिढया एकच व्यवसाय करणार्‍या आणि जास्त सहभाग असणार्‍या शेतीच्या क्षेत्रातील शेतकरी महिला मात्र यात कुठेच दिसत नाहीत किंवा त्यांचा एकत्र बोलवून समारंभपूर्वक त्यांचा सत्कार, कौतुक काही केले जात नाही. अशा शेतकरी महिलांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्याची आणि त्यांच्या परिश्रमाला दाद देण्याचे काम कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागामार्फत करण्यात आले. दापोली तालुक्यातील कुडावळे गावातील शेतकरी महिला सौ. राधिका मोरे. वीस वर्षांपूर्वी मुंबईतील आपला संसार गुंडाळून आपल्या पतीसमवेत कुडावळे येथे आल्या सुरूवातीला भाडयाने जमीन घेऊन त्यांनी शेतीला सुरूवात केली. आणि आज ६ एकर शेतीचे मालक झाल्या आहेत. महिला किसान दिनानिमित्त त्यांना भेटून त्यांचे शेतीतील योगदान, त्यांच्या भविष्यातील योजना जाणून घेण्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागातील अधिकारी आणि कृषीकन्या यांनी त्यांची भेट घेवून सम्मानचिन्ह देऊन सत्कार केला.यावेळी डॉ. प्रवीण झगडे, सौ. शिल्पा नाईक, श्रीयष पवार, आणि कृषीकन्या सुचिता आदाटे, प्राजक्ता हंकारे, गौरी नाईक, कोमल म्हस्के, मयुरी कोंडुस्कर, समृध्दी राठोड, स्नेहल बनकर उपस्थित होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares