Maharashtra News Updates 24 October 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर… – ABP Majha

Written by

By : एबीपी माझा वेब टीम | Updated: 24 Oct 2022 11:03 AM (IST)
LIVE UPDATES#Breaking : कारगिलहून पंतप्रधान मोदी लाईव्ह…#PMModi #Kargil #Diwali2022 https://t.co/CAp2EmTmLD pic.twitter.com/a5dvpJCQWO
वर्धा आणि बडनेरा दरम्यान मालगाडीचे 20 डबे घसरले
रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी मालखेड – टीमटाला स्टेशन दरम्यान घडली दुर्घटना
कोळसा घेऊन जात होती मालगाडी
नागपूर-मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवल्या तर काही गाड्या रद्द केल्या
दिवाळी च्या दिवशी प्रवाशांची परवड होण्याची शक्यता
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी… या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू… 
आज लक्ष्मीपूजन
दिवाळीच्याच दिवशी माता लक्ष्मी प्रगट झाली होती अशी मान्यता असून आजच्याच दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. वाल्मिकी रामायणानुसार या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा विवाह झाला होता. दिवाळीच्या सांयकाळी लक्ष्मी, गणेश आणि भगवान कुबेराची पुजा केली जाते. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. यंदा अमावस्या तिथी 24 ऑक्टोबर रोजी सांयकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर 25 ऑक्टोबर सांयकाळी 4 वाजून 18 मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे. 
दिवाळी पहाट कार्यक्रमात  शिंदे गट आणि ठाकरे गटात चढाओढ
दहीहंडी, नवरात्र नंतर दिवाळी पहाट कार्यक्रमात देखील शिंदे गट आणि ठाकरे गटात चढाओढ. आज सकाळी तलावपाळी येथे शिंदे गटातील युवासेनेकडून आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या जागी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मिळाल्याने, राजन विचारे यांनी आपला कार्यक्रम त्याच्याच थोडा पुढे आयोजित केला आहे. तर राजन विचारे यांच्या पुढे चिंतामणी चौकात शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांनी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे ठाण्यातील तरुणाईची चंगळ असली तरी राजकीय रस्सीखेच दिसून येणार आहे. दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले जाईल. तसेच राजकीय सामना देखील रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षीची ठाण्यातील दिवाळी पहाट कोणत्याही वादा विना पार पाडण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. 
लक्ष्मीपूजनासाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंग
आज बीएसईचा लक्ष्मीपूजनासाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंग होईल. संध्याकाळी 6 वाजता प्रे-ओपन सेशन असेल तर संध्या. 6:15 ते संध्याकाळी 7:15 पर्यंत विशेष ट्रेडिंग पार पडेल. दुपारी 3:30 वाजता लक्ष्मीपूजन असणार आहे. तर संध्याकाळी 5 ते 6 मध्ये बीएसईसंदर्भातले विशेष पुरस्कार प्रदान केले जातील. 
शरद पवार आज पुरंदरच्या दौऱ्यावर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पुरंदरच्या दौऱ्यावरती असणार आहेत. आज सकाळी पुरंदर तालुक्यातील परिंचे येथे शरद पवार अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांशी सवांद साधणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सैनिकांसोबत दिवाळी साजरी करू शकतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सैनिकांसोबत दिवाळी साजरी करू शकतात. विशेष म्हणजे पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी गेल्या 8 वर्षांपासून सैनिकांमध्ये दिवाळीचा सण साजरा करत आहेत. 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन 
बुलढाणा : अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदत न केल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय झाल्याचा आरोप करत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी “शेतकऱ्यांची दिवाळी शासनाच्या दारी” हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज जळगाव जामोद उपविभागीय कार्यलयासमोर करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे.
Man Called Girl ‘Item’ : तरुणीला ‘आयटम’ म्हणणं तरुणाला पडलं महागात, कोर्टाने सुनावली दीड वर्षांची शिक्षा
Share Market Muhurat Trading: दिवाळीनिमित्ताने शेअर बाजारात आज एक तासासाठी होणार मुहूर्त ट्रेडिंग; जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल
Raj Thackeray on Har Har Mahadev : हर हर महादेव चित्रपट पाहिल्यानंतर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
कापसाच्या शेतात केली गांजाची लागवड, गुन्हा दाखल, अडीच लाखांचा गांजा जप्त
BEST Bus Workers Strike: सलग तिसऱ्या दिवशी ‘बेस्ट’ विस्कळीत; मरोळ बस आगारामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares