PM Kisan Yojna | पीएम किसान योजनेचा 12 हप्ता अजून मिळाला नसेल, तर अशा प्रकारे करा चेक – InShorts Marathi

Written by


टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशात सगळीकडे दिवाळीची चाहूल लागली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojna) 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीची भेटवस्तू म्हणून ट्रान्सफर करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते. कारण गेल्या वर्षी हा हप्ता ऑगस्ट महिन्यात आला होता तर यावर्षी या त्याचा अजूनही पत्ता नव्हता. दरम्यान, 17 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान (PM Modi) नरेंद्र मोदी यांनी 12 व्या हप्त्यातील 16,000 कोटीहून अधिक रक्कम 8,000 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर केली आहे.
पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतच फोनद्वारे त्यांना त्याचा मेसेज मिळाला आहे. मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांना 12 वा हप्ता ट्रान्सफर होण्याचा कोणताही मेसेज मिळालेला नाही. पीएम योजनेचा 12 वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करणे अत्यावश्यक होते. ज्या शेतकऱ्यांचे केवायसी नाही त्यांना यादीतून वगळण्यात आले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत आपले नाव कसे तपासावे किंवा त्याबद्दल कोणता हेल्पलाइन क्रमांक वापरावा हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
शेतकऱ्यांना त्यांच्या 12 व्या हप्त्याची अमाऊंट मिळाली नसेल तर त्यांनी पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर क्रमांक 155261 किंवा टोल फ्री क्रमांक 1800-115-526 आणि 011-23381092 या नंबरवर कॉल करा. या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमची समस्या नोंदवू शकता किंवा पीएम किसान योजनेच्या संबंधित प्रश्न विचारू शकता. त्याचबरोबर तुम्ही pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडी द्वारे देखील आपली समस्या कळू शकतात.
महत्वाच्या बातम्या 
CM Eknath Shinde | शिंदे साहेब! दिवाळी गोड करण्यासाठी सर्व शेतकरी पुत्रांनी तुम्हाला…
CM Eknath Shinde | शिंदे साहेब! दिवाळी गोड करण्यासाठी सर्व शेतकरी पुत्रांनी तुम्हाला…
CM Eknath Shinde | शिंदे साहेब! दिवाळी गोड करण्यासाठी सर्व शेतकरी पुत्रांनी तुम्हाला…
Raju Shetti | “पन्नास हजार रुपये तुमच्या पन्नास खोक्यांपुढे…”;…
Comments are closed.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares