Today News: देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडींग सुरू, ट्रेडिंग करण्यापूर्वी लक्ष्मीचे पूजन
आज दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग 2022 सुरू झाले आहे. यादरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये प्रत्येकी एक टक्का वाढ झाली आहे. देशातील प्रमुख शेअर बाजार BSE आणि NSE मध्ये आज एक तास मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे.
 भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. दीडशेपेक्षा जास्त खासदारांचं समर्थन सुनक यांना मिळालं होतं. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काल पंतप्रधानपदाच्या रेसमधून माघार घेतल्यानंतर ऋषी सुनक यांचं नाव आघाडीवर होतं. ऋषी सुनक हे ब्रिटनचे अर्थमंत्री राहिलेले आहेत.
कोणत्या पिकाचं नुकसान झालं आणि कसं नुकसान झालं, ते उद्धव ठाकरेंनी पाहिलं नाही. त्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा. अडीच वर्ष काही केलं नाही पण बांधावरच्या नावानं पहिल्यांदा घरातून बाहेर निघाले, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं. मी त्यांना शेतात पाहिलं नाही. तुम्ही पाहिलं का? शेताच्या बाहेरून त्यांनी पत्रकार परिषद घेतली, असा टोला नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अवघ्या 13 महिन्याच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. ओळखीतल्या व्यक्तीनेच हे दुष्कृत्य केले आहे. या व्यक्तीविरोधात वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे त्यात लोकं दिवाळी साजरी करत आहेत. काल उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना भेट दिली. त्यांचा विश्वासघात न करता आम्ही त्यांची कामे करू असंही नीलम गोऱ्हे यांनी म्हंटलं आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानाची पंचनामे झाले नाहीत, 15 दिवस झाले तरी राज्यातील शेतकऱ्यांना मदत झालेली नाही, राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली नाही असंही नीलम गोऱ्हे यांनी म्हंटलं आहे.
राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबादमध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. त्यांनी शेतीच्या नुकसानीची पाहणी केली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सासवडमधील परींचे भागात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला.
वर्धा-बडनेरा रेल्वे मार्गावर मालखेड ते टिमटाळा स्थानकादरम्यान मालगाडीचे वीस डबे रुळावरून घसरले. मध्यरात्री कोळशाची मालगाडी रुळावरून घसरल्याने या रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.या मार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या पर्यायी मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. या अपघातामुळे दिवाळीला नागपूर-मुंबई रेल्वे मार्ग बंद असल्याने गावात दिवाळीसाठी येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
करगिलमधील आठवणी विसरू शकत नाही.
सीमा सुरक्षित तर देश सुरक्षित- मोदी
प्रत्येक लढाईत कारगिलने विजयी ध्वज फडकावला
परदेशातून शस्त्र विकत घेणार नाही- मोदी
मान्सून परतताच शहरातील तापमान ७ ते ८ डिग्रीने घटले असून अचानक काल रात्री पासून आज सकाळ पर्यंत गार वाऱ्यासह थंडी अनुभवायला मिळाली. आज पुण्यात १४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. शिवाजीनगर परिसर १४.४, लोहगाव १५.८, चिंचवड १७.७, लवळे १७.८, मगरपट्टा १८.५ तापमानची नोंद झाली आहे.
डोंबिवलीच्या फडके रोडवर तरुणांची गर्दी झाली असून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र फडके रोडवरती आकर्षण ठरले ते तीन श्वान. या श्वानाना हात लावण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी बच्चे कंपनीने गर्दी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले कारगिलमध्ये, आज जवानांसोबत साजरी करणार दिवाळी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज हे सासवडमधील परींचे भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या संवाद साधून समस्या जाणून घेणार आहे. त्यानंतर ते तिथे शेतकरी मेळाव्यात 10 वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.
राज्यावर अस्मानी संकट आणि महागाईच्या मुद्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिंदे सरकारवर टीका करण्यात आली आहे. राज्यातील महानगरे व मोठय़ा शहरांत दिवाळीचा धुमधडाका जोरात दिसत असला तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ग्रामीण जनता मात्र ऐन दिवाळीत चिंताक्रांत होऊन बसलेली दिसत आहे.
काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याची चर्चा सुरु असतानाच, त्याचवेळी एका शेतकऱ्याने पावसामुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. कन्नड तालुक्यातील नादरपूर शिवारात रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
वर्धा-बडनेरा दरम्यान मालगाडीचे 20 डबे घसरलेत. त्यामुळे नागपूर मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी मालखेड-टीमटाला स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे ऐन दिवाळीच्या दिवशी प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares