आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी ; पिंपरी-चिंचवड पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची सूचना – Loksatta

Written by

Loksatta

पिंपरी :  सध्या वातावरणीय बदलांमुळे ऋतुचक्रात अनेक बदल होत आहेत. त्यामुळे अनेकदा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते. अशा परिस्थितीत महापालिकेसह सर्व यंत्रणा प्रभावी आणि सक्षमपणे कार्यान्वित असणे आवश्यक आहे, अशी सूचना पिंपरी-चिंचवड पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केली.
पिंपरी पालिका आणि पॅलेडियम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल कलासागर येथे पूर आपत्ती व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सिंह बोलत होते. आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ कर्नल विश्वास सुपनेकर, बालाजी चौहान, आदिती घोष यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण केले. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>> खर्डा भाकरी खाऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन ; बळीराजा शेतकरी संघटनेकडून साखर कारखानदारांचा निषेध
आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या धरण प्रवणक्षेत्रात अतिवृष्टी झाली, धरण पूर्ण भरले आणि पावसाची संततधार कायम राहिल्यास शहरात पूर परिस्थिती उद्भवू शकते. अशा वेळी महापालिकेचे सर्व विभाग आपत्कालीन परिस्थितीला सक्षमपणे व प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी सज्ज असणे गरजचे आहे. आपत्तीमध्ये सहाय्य करणाऱ्या इतर संबंधित यंत्रणांसमवेत संपर्क आणि समन्वय प्रभावी असणे आवश्यक आहे. कोणत्याही आपत्तीचे व्यवस्थापन करत असताना सर्वसमावेशक अद्ययावत माहिती; तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर कामकाजात कसा करावा, यासाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरतात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण गावडे यांनी केले. अमित पटजोशी यांनी आभार मानले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares