कराडमध्ये ठिणगी पडली: ऐन दिवाळीत बळीराजा शेतकरी संघटनेचे खर्डा – भाकरी आंदोलन; ऊस दरावरून आक्रमक – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
मागील हंगात साखर कारखान्यांनी योग्य दर दिलेला नसताना यंदाच्या हंगामात दर जाहीर न करताच कारखाने सुरू केल्याने बळीराजा शेतकरी संघटनेने दिवाळी दिवशीच कराड तहसील कचेरी समोर खर्डा भाकरी खाऊन आंदोलन केले. तसेच सरकार आणि कारखानदारांविरोधात घोषणाबाजी केली.
योग्य दर दिला नाही
सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केले आहेत. मात्र, दर जाहीर केलेला नाही. काही कारखान्यांनी मागील हंगामात योग्य दर दिलेला नाही. त्यात यंदाचा गळीत हंगाम सुरू करताना दर जाहीर करण्याचे टाळले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी कराड तहसील कचेरीच्या आवारात खर्डा-भाकरी खात सरकार आणि कारखानदारांविरोधात घोषणाबाजी केली.
दर जाहीर करा
सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मागील हंगामात योग्य ऊसदर दिलेला नाही. तसेच यंदाचा ऊसाचा दर जाहीर न करताच कारखाने सुरू केले आहेत. कारखान्यांनी यंदाच्या हंगामातील श ऊस दर तातडीने जाहीर करावा आणि मागील बाकी द्यावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares