Maharashtra News Updates 24 October 2022 : ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान, पेनी मॉर्डंट यांची माघार – ABP Majha

Written by

By : एबीपी माझा वेब टीम | Updated: 24 Oct 2022 10:26 PM (IST)
अंबरनाथच्या बुवापाडा परिसरात प्लास्टिकच्या साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. दरम्यान हे गोडाऊन मानवी वस्तीत असल्याने एकच गोंधळ उडाला आहे. आग मोठ्या प्रमाणात असल्याने आगीचे लोट हे मानवी वस्तीत येत आहेत. कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे हे गोडाऊन उभारण्यात आले आहे. शिवाय अनेक भंगार माफीयांनी आपले बस्थान इथे मांडले आहे. त्यांच्यावर पालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने अशा प्रकारच्या दुर्घटना इथे वारंवार होत आहेत. या दुर्घटनांमुळे  इथला नागरिकांना याचा मोठा त्रास होतो. सध्या अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांच्या साहाय्याने आग विझवण्यात यश मिळालं आहे. मात्र एखाद्या फटाका उडून या गोडाऊन मध्ये जाऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे, सध्या आग नियंत्रणात असून या गोडाऊन ला कुलिंग करण्याचा काम अग्निशमन दलाकडून सुरू आहे. 
नागपूर-पुणे मुंबई रेल्वे मार्गावर  मालगाडीचे डबे घसरल्यानंतर आज रात्री 10 नंतर एक रेल्वे ट्रँक सुरू होण्याची शक्यता..
रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यासाठी सकाळपासून रेल्वेचे युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू..
700 पेक्षा अधिक कर्मचारी सकाळपासून दिवाळीच्या दिवशी कामावर हजर..
अमरावतीच्या मालखेड रेल्वे जवळ मालगाडीचे 19 डबे घसरले होते रुळावरून खाली..
भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधा झाले आहेत. पेनी मॉर्डंट यांनी माघार घेतल्याने सुनक यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा झाला. 
भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान. https://t.co/npvqdHujNl pic.twitter.com/idG5adyZoZ

 
Diwali 2022 : दिवाळी निमित्ताने आज जळगावच्या बाजारपेठेत विविध साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी उसळली असून या मध्ये मिठाई खरेदीसाठीही मोठी गर्दी दुकानांमध्ये झाली आहे.
मिठाई दुकानात मिठाई खरेदीसाठीही ग्राहकांना मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. 
शेअर बाजारातील आजच्या विशेष मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्समध्ये 500 अंकांची वाढ होऊन तो 59,877 वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 165 अंकांची वाढ होऊन तो 17,742 वर पोहोचला. एल ॲंड टी, बजाज फायनान्स, एचडीएफसी बॅंक, एचडीएफसी, एनडीपीसी आणि महिंद्रा ॲंड महिंद्राच्या समभागात मोठी उसळी झाल्याचं दिसून आलं. तर कोटक बॅंक आणि एचयूएलच्या समभागात मात्र घसरण झाली.
आज शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग असणार असून त्यासाठी अभिनेता अजय देवगणच्या हस्ते लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम पार पडत आहे. थॅंक गॉड आणि दृश्यम-2 च्या पार्श्वभूमीवर अजय देवगणने शेअर बाजारात हजेरी लावली आहे. आज संध्याकाळी 6.15 ते 7.15 वाजेपर्यंत मार्केट सुरू राहणार आहे.
Diwali 2022 : दिवाळी निमित्ताने खान्देशात व्यापारी वर्गात खतावणी म्हणजेच वही पूजन करण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार अनेक व्यापाऱ्यांनी मोठ्या भक्तीभावाने वही पूजन केल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्या व्यावसायाशी निगडित वर्षभराच्या आर्थिक व्यवहाराची नोंद ज्या वाह्यांच्या मध्ये केली जाते त्या वहीला व्यापारी वर्गात खूप महत्व दिले जाते. दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मीपूजन करण्याबरोबरच व्यापारी वर्गात विधिवत या वहीच मुहूर्त काढून पूजन करण्याची खान्देशात परंपरा आहे. या परंपरेनुसार आज अनेक व्यावसायिकांनी आपल्या वहीचे पूजन केल्याचं पाहायला मिळाले आहे. वही पूजन केल्याने व्यवसाय वृद्धी होत असल्याची अनेक व्यापाऱ्यांची श्रद्धा आहे आणि याच श्रद्धेपोटी वही पूजन करण्यात येत असल्याचं व्यापार व्यावसायात परंपरा असल्याचं व्यापारी सांगतात.
 

कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यातील मागडी तालुक्यातील  कंचूगल बंडेमठाचे पीठाधीश बसवलिंग स्वामीजी (45) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या खोलीत तीन पानी सुसाइड नोट सापडली आहे. 
यवतमाळच्या पुसद येथील ‘माणुसकीची भिंत’ फाउंडेशनने वंचितांसोबत दिवाळी सण साजरा केला. रस्त्यावर भटकणाऱ्या या वंचितांची दाढी, कटिंग करून, त्यांना अभ्यंगस्नान घालून कपडे देण्यात आले. महिलांना साडी, लहान मुलांना कपडे आणि सगळ्यांना फराळ वितरित करून त्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. या बेघर लोकांना त्यानिमित्ताने दिवाळीचा आनंद लुटता आला. गेल्या सात वर्षांपासून माणुसकीची भिंत कडून हा उपक्रम राबविण्यात येतो शिवाय दररोज गरजू आणि रुग्णांना अन्नदान केल्या जाते.
दिवाळी प्रकाश पर्वाचा सण आता दोन दिवसावर आला आहे. दिवाळीत म्हणजेच गाय पूजनाच्या दिवशी गायींना चटईवर बसविण्याची पारंपरिक प्रथा आहे. त्यासाठी आतापासूनच ग्रामीण भागात गायींना चटईवर बसविण्याचा सराव सुरू करण्यात आला आहे. सर्वत्र लंपी आजार पसरत आहे. गायींना या आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेत सराव केला जात आहे.
राज्य सरकारतर्फे दिवाळीनिमित्त 100 रुपयांत देण्यात येत असलेला आनंदाचा शिधा किटचे वाटप अखेर परभणीत सुरू झाले आहे. जिल्हाभरातील 1184 स्वस्त धान्य दुकानावरून 3 लाख 5 हजार 923 किट वाटप करण्यात येत असुन गंगाखेडमध्ये रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले, तर जिंतुर मध्ये भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले आहे.
LIVE UPDATES#Breaking : कारगिलहून पंतप्रधान मोदी लाईव्ह…#PMModi #Kargil #Diwali2022 https://t.co/CAp2EmTmLD pic.twitter.com/a5dvpJCQWO
वर्धा आणि बडनेरा दरम्यान मालगाडीचे 20 डबे घसरले
रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी मालखेड – टीमटाला स्टेशन दरम्यान घडली दुर्घटना
कोळसा घेऊन जात होती मालगाडी
नागपूर-मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवल्या तर काही गाड्या रद्द केल्या
दिवाळी च्या दिवशी प्रवाशांची परवड होण्याची शक्यता
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी… या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू… 
आज लक्ष्मीपूजन
दिवाळीच्याच दिवशी माता लक्ष्मी प्रगट झाली होती अशी मान्यता असून आजच्याच दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. वाल्मिकी रामायणानुसार या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा विवाह झाला होता. दिवाळीच्या सांयकाळी लक्ष्मी, गणेश आणि भगवान कुबेराची पुजा केली जाते. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. यंदा अमावस्या तिथी 24 ऑक्टोबर रोजी सांयकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर 25 ऑक्टोबर सांयकाळी 4 वाजून 18 मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे. 
दिवाळी पहाट कार्यक्रमात  शिंदे गट आणि ठाकरे गटात चढाओढ
दहीहंडी, नवरात्र नंतर दिवाळी पहाट कार्यक्रमात देखील शिंदे गट आणि ठाकरे गटात चढाओढ. आज सकाळी तलावपाळी येथे शिंदे गटातील युवासेनेकडून आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या जागी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मिळाल्याने, राजन विचारे यांनी आपला कार्यक्रम त्याच्याच थोडा पुढे आयोजित केला आहे. तर राजन विचारे यांच्या पुढे चिंतामणी चौकात शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांनी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे ठाण्यातील तरुणाईची चंगळ असली तरी राजकीय रस्सीखेच दिसून येणार आहे. दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले जाईल. तसेच राजकीय सामना देखील रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षीची ठाण्यातील दिवाळी पहाट कोणत्याही वादा विना पार पाडण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. 
लक्ष्मीपूजनासाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंग
आज बीएसईचा लक्ष्मीपूजनासाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंग होईल. संध्याकाळी 6 वाजता प्रे-ओपन सेशन असेल तर संध्या. 6:15 ते संध्याकाळी 7:15 पर्यंत विशेष ट्रेडिंग पार पडेल. दुपारी 3:30 वाजता लक्ष्मीपूजन असणार आहे. तर संध्याकाळी 5 ते 6 मध्ये बीएसईसंदर्भातले विशेष पुरस्कार प्रदान केले जातील. 
शरद पवार आज पुरंदरच्या दौऱ्यावर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पुरंदरच्या दौऱ्यावरती असणार आहेत. आज सकाळी पुरंदर तालुक्यातील परिंचे येथे शरद पवार अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांशी सवांद साधणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सैनिकांसोबत दिवाळी साजरी करू शकतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सैनिकांसोबत दिवाळी साजरी करू शकतात. विशेष म्हणजे पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी गेल्या 8 वर्षांपासून सैनिकांमध्ये दिवाळीचा सण साजरा करत आहेत. 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन 
बुलढाणा : अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदत न केल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय झाल्याचा आरोप करत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी “शेतकऱ्यांची दिवाळी शासनाच्या दारी” हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज जळगाव जामोद उपविभागीय कार्यलयासमोर करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे.
Kerala: नऊ विद्यापीठांतील कुलगुरुंना हायकोर्टाचा दिलासा, अंतिम आदेश येईपर्यंत कुलगुरु पदावर कायम
Loreal प्रोडक्ट्स वापरल्याने कँसर? अमेरिकेत कंपनीविरोधात खटला दाखल
Diwali Celebration At White House : व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन; जो बायडन यांनी साजरा केला दिव्यांचा सण
Cyclone Sitrang : बांगलादेशात ‘सितरंग’ चक्रीवादळाचे पाच बळी, भारतात अनेक राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता
Solar Eclipse : सुरक्षितपणे सूर्यग्रहण कसे पाहावे? ‘अशी’ घ्या काळजी

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares