Mumbai : पालकमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे शेतकरी आक्रमक – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील मुरुड व रोहा तालुक्यात होणाऱ्या बल्क ड्रग फार्मा पार्क प्रकल्पाला २२ गावांतील शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केला होता. या विरोधामुळे हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, असे असताना उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्योग विभागाकडून हा प्रकल्प पुन्हा आणण्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी १ नोव्हेंबरला अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
बल्क ड्रग फार्मा पार्क प्रकल्पामुळे २२ गावांतील शेतकऱ्यांच्या सुपीक जमीनी, शाळा, घरे जाण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे तीन वर्षांपासून भूमिपुत्र शेतकरी संघटनेने प्रशासनाविरोधात लढा उभारला होता. या विरोधामुळे हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. असे असताना राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्योग विभागाकडून हा प्रकल्प आणण्याचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे शेतकरी पुन्हा आक्रमक झाले असून अलिबाग येथे पत्रकार परिषदेतून या व्यक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे.
यावेळी भूमीपुत्र शेतकरी संघटनेचे अॅड. महेश मोहिते यांनी बल्क ड्रग फार्मा पार्क प्रकल्पाविरोधातील भूमिका स्पष्ट करत १ नोव्हेंबरला अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
तसेच या आंदोलनात शेतकरी, स्थानिक, मच्छीमार मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
रायगड जिल्ह्यात प्रकल्प आणण्याच्या हालचाली मागील तीन वर्षांपासून सुरु होत्या. त्यासाठी एमआयडीसीमार्फत भूसंपादन करण्याची प्रक्रिया ही सुरु करण्यात आली होती. मात्र, प्रकल्पाविरोधातील शेतकऱ्यांच्या संघर्षामुळे हा प्रकल्प रद्द झाला होता.
-अॅड. महेश मोहिते, सदस्य, भूमिपुत्र संघटना
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares