Solapur : उसाला पहिली उचल तीन हजार रुपये द्या : ऊस दराचा प्रश्न पेटण्याची चिन्हे – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
मोहोळ : कारखानदारांनी उसाची पहिली उचल तीन हजार रुपये द्यावी,अन्यथा सहकार मंत्र्यांच्या निवासस्थाना समोर बोंबा बोंब आंदोलन करण्याचा इशारा जनाहित संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.त्यामुळे सोलापुर जिल्ह्यातील ऊस दराचा प्रश्न पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
या संदर्भात माहिती देताना देशमुख म्हणाले, पंढरपूर येथे रविवार ता २३ रोजी ऊस परिषद संपन्न झाली.या परिषदेत शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी उसाला प्रति टन पहिली उचल अडीच हजार रुपये मागीतली आहे. परंतु त्या मागणीला जनहित शेतकरी संघटनेचा कडाडुन विरोध आहे.
कारण अडीच हजार रुपये कांही कारखानदार गेल्या चार ते पाच वर्षापासून देतात,तर वाढीव पैसे कारखान्याच्या सोयी प्रमाणे दिले जातात. चालू परिस्थिती पाहीली तर खताच्या किमतीत दरवर्षी २०० ते ३०० रुपये दर वाढ होते. त्याकडे शासन लक्ष देत नाही. शेत मजुरी वाढत आहे. सकाळी आठ वाजता शेतात कामाला गेलेला मजुर दुपारी एक वाजता घरी आला तर येताना चारशे रुपये मजुरी घेऊन येतो.
शेती पंपाचे विज बिल वाढले आहे. मशागतीचे दर ही वाढले आहेत. त्यामुळे अडीच हजार रुपये पहिली उचल ऊस उत्पादक शेतकऱ्यांना परवडणारी नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,कॅबिनेट सहकार मंत्री यांनी लक्ष घालुन पहिली उचल तीन हजार रुपये कारखानदारांना देण्यास भाग पाडावे. १०० रुपये पोळ्याच्या सणाला व १०० रुपये दिवाळीला वाढीव जाहीर करावी. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार पहिली उचल ३ हजार २००ते ३ हजार ४०० रुपये देतात.
कर्नाटकात चार हजार रुपये दर दिला जातो. मग सोलापूर जिल्ह्यातल्या कारखानदारांना का परवडत नाही. जिल्ह्यातील साखर कारखानदार गेल्या कित्येक वर्षापासून ऊस दरा बाबत शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत. रिकव्हरी कमी दाखवतात. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जनहित शेतकरी संघटनेची बैठक आयोजीत करून योग्य तोडगा काढला पाहिजे.
रिकव्हरी वर ही उपाय काढला पाहिजे. रिकव्हरी कितीही असो पहिली उचल ३ हजार देणे शासनाने बंधनकारक करावे. अशी मागणी अध्यक्ष देशमुख यांनी केली आहे. साखर कारखानदारांना प्रतिटन ४ हजार ९०० रुपये फायदा होतो, यामध्ये वाहतूक तोडणी खर्च व उत्पादन खर्च १३०० रुपये वगळला तर उर्वरीत ३ हजार ६०० रुपयात ३ हजार रुपये पहिली उचल देणे कारखानदारांना शक्य आहे.
तरी ही ऊस उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय करतात याचा अभ्यास शासनाने केला पाहिजे. यावर लवकर तोड़गा न निघाल्यास येत्या कांही दिवसात जनहित शेतकरी संघटना,सोबत येतील ते पक्ष व संघटना, विविध शेतकरी संघटना यांना बरोबर घेऊन जन आंदोलन उभा करून कारखानदारांना जाब विचारणार असल्याचे देशमूख यांनी सांगीतले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांत निकम, किशोर दत्तू, नाना मोरे,महेश बिस्किटे, बाळासाहेब सपाटे, सिताराम रणदिवे, कुमार गोडसे, हरिभाऊ लोंढे, प्रकाश शिंगाडे, तानाजी मुळे, हरिभाऊ मुळे, हनुमंत भोसले,अण्णा इंगोले उपस्थीत होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares