दिव्य मराठी विशेष: दिवाळीनिमित्त गरजू नागरिकांना रवा-साखर वाटप; अंबिका सोशल फाउंडेशनचा उपक्रम – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या सर्व कष्टकरी, शेतकरी, कामगार, मजूर अशा सर्व वर्गाची दिवाळी आनंदाची आणि गोड करण्यासाठी यंदाही अंबिका हिंगमिरे यांच्या नेतृत्वातील अंबिका सोशल फाउंडेशनने दिवाळी निमित्ताने तब्बल दहा हजार कुटुंबांना रवा आणि साखरेचे वाटप करत दिवाळी निमित्ताने गोडवा निर्माण करण्यात आला. वर्धा शहर आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी हा उपक्रम राबवत हिंगमिरे यांनी पुन्हा एकदा आपल्या सामाजिक कार्याचा परिचय करून दिला आहे.अंबिका सोशल फाउंडेशन दरवर्षी गोरगरिबांची दिवाळीदरम्यान विविध उपक्रम राबवत असते.
त्यापैकीच एक रवा आणि साखर वाटपाचा उपक्रम मोठ्या पातळीवर या वर्षी देखील साजरा करण्यात आला. यात वर्धा शहर आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन अंबिका हिंगमिरे यांनी तब्बल १० हजार कुटुंबांना रवा आणि साखर वाटप करून त्यांना मदतीचा हात दिला. या वेळी स्वत: अंबिका हिंगमिरे यांनी सर्व कामगार, शेतकरी, मजूर वर्गाच्या कुटुंबाच्या भेटी घेऊन त्यांची परिस्थिती देखील समजून घेतली. भविष्यात देखील अडचण आल्यास आम्हाला हाक द्या आम्ही तत्पर राहू असा विश्वास अंबिका हिंगमिरे यांनी दिला. या वेळी कामगार संघटनेचे हरेश्वर कोरडे, रवींद्र लाखे, अंबादास मानेकर, किशोर खोडके, मयूर लांबट, स्त्री शक्ती वीरांगना ब्रिगेडच्या दीपाली गोजे, नीलिमा बुटे, रूपाली जुमले, राहुल काटावे, अखिल खोडके, प्रवीण गौतम, कैलास तायडे, सुनील शेळके, पवन मेहर आदींची उपस्थिती होती.
गोरगरिबांची दिवाळी साजरी झाल्याचा आनंद
स्वत:कडे सर्व काही असताना इतरांकडे दुर्लक्ष करून केवळ स्वत:ची दिवाळी साजरी करणारे अनेक जण आहेत. मी माझ्या स्वभावाप्रमाणे आधी इतरांच्या जीवनात गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न करून नंतर स्वत:चा आनंद त्यात शोधण्याचा प्रयत्न करते. गोरगरिबांची दिवाळी साजरी झाल्यानंतर मला आता माझी दिवाळी साजरी झाल्याचा आनंद होतोय, अशी प्रतिक्रिया फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष अंबिका हिंगमिरे यांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares