निषेध व्यक्त: वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांचे आवाहन – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
अमरावती जिल्ह्यातील आमदार रवी राणा यांनी माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांच्यावर गोरगरीब, दिव्यांग ,शेतकरी जनता यांच्यासाठी केलेले आंदोलन हे केवळ सेटलमेंट करून पैसे कमवण्यासाठी केलेले आहे, असा आरोप केला. याचा तीव्र निषेध श्रीगोंदे तालुका प्रहार संघटनेच्या वतीने करणयात आला.तालुकाध्यक्ष सुरेश सुपेकर व जिल्हा उपाध्यक्ष वामन भदे यांच्या उपस्थितीत हा निषेध व्यक्त करण्यात आला.
संघटनेचे तालुकाध्यक्ष सुपेकर म्हणाले, आमदार कडू यांच्यावर केलेले आरोप आमदार राणा यांनी सिद्ध करावे अन्यथा प्रहार संघटनेचे पदाधिकारी व गोरगरीब जनता यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये. सिद्ध न केल्यास गोरगरीब जनता दिव्यांग शांत न बसता मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष वामन भदे, विजय शेंडगे, संतोष गायकवाड, शांतीलाल मदने, अमोल कांबळे, महादेव बनसोडे, ज्ञानदेव भैलुमे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares