Pune rain update heavy rain in pune traffic jam water entered dagdusheth ganpati temple – My Mahanagar

Written by

You subscribed MyMahanagar newsletter successfully.
Something went wrong. Please try again later.
राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. काढणीला आलेलं उभं पिक या पावसामुळे नष्ट झालं आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागातील शेतकरी आता सरकारी मदतीची वाट बघत आहेत. या पुण्यातही परतीच्या पावसाने थैमान घातलं आहे. पुण्यातील अनके भागात जोरदार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरुप आल आहे. पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात देखील पाणी शिरलं आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून रात्री उशीरापर्यंत पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. याशिवाय श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या संग्रहायलातही पावसाचे पाणी शिरले, दरम्यान शहरातील अनेक भागात हीच स्थिती पाहायला मिळाली.
पुण्यात रस्त्यावर जमा झालेल्या पावसाच्या पाण्यातून वाट काढताना पुणेकरांची दमछाक झाली. अनेक वाहनं ही पाण्यात अडकून पडली होती. याशिवाय सखल भागातही मोठ्याप्रमाण पाणी साचलं होतं, अनेक नागरिकांच्या घरातही पावसाचे पाणी शिरले. दरम्यान राज्यातील विविध भागात पावसानं धुडगूस घातला आहे. यामुळे नागरिकांना अनेक समस्या येत आहेत. यात पुण्यातील येवलेवाडी स्मशानभूमीजवळ, सुखसागर नगर, अंबामाता मंदिर, कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड, रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ, सुखसागर नगर, डॉल्फिन चौक, बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर, हडपसर, गाडीतळ अशा अनेक भागात पावसाचं पाणी शिरलं. त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहे. विशेषत: या पावसामुळे वाहतुकीवर मोठ्याप्रमाणात परिणाम झाला. अलका टॉकीज परिसरातील रस्त्यांनाही नदीचे स्वरुप आले होते. यात अनेक दुचाकी वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कोंढवा, हडपसरमध्येही रस्ते जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या पावसाचा फटका महालक्ष्मी एक्सप्रेसलाही बसला आहे.
यात रमणा गणपती पर्वतीमध्ये एका ठिकाणी भिंतीचा भाग कोसळण्याची घटना घडली, तर दुसरीकडे हडपसरमध्ये आकाशवाणीजवळ झाडपडीची घटना समोर आली आहे. याशिववाय कोंढवा खुर्द भाजी मंडई येथे एका ठिकाणी मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यात 7 नागरिक अडकले पडले होते. यामध्ये 5 मोठे नागरिक आणि 2 लहान मुलांचा समावेश होता. मात्र या नागरिकांना सुखरुपपणे बाहेर काढण्यातं आलं आहे. तर सदा आनंदनगरमधून पाच जणांनाही पाण्यातून सुखरुप बाहरे काढण्यात यश आलं आहे. यामध्ये 3 लहान मुली 1 महिला 1 पुरुष होते. यामुळे पुण्यातील आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी रात्रीभर काम करत होते.
ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी ‘माय महानगर’चे Android App डाऊनलोड करा

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares