Sakhar Sangh : बाबा ओहोळ, नरेंद्र घुले यांची साखर संघाच्या संचालकपदी निवड – Agrowon

Written by

नगर ः सहकारासाठी आदर्शवत असणाऱ्या संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे (Bahusabh Thorat Co-operative Sugar Mill) अध्यक्ष बाबा ओहोळ (Baba Ahol) आणि भेंडे (ता. नेवासा) येथील सहकारमहर्षी मारुतराव घुले पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र घुले पाटील (Dr. Narendra Ghule Patil) यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या संचालकपदी निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या माध्यमातून सहकारी साखर कारखान्याची गुणवत्तावाढ, शेतकरी व साखर कारखान्यांच्या समस्या, शेतकऱ्यांना रास्त भाव, उसाला देण्यात येणारा एफआरपी, कारखान्यांना होणाऱ्या वित्त पुरवठ्यातील व्यावहारिक अडचणी, साखर निर्यातीचे प्रश्‍न अशा विविध प्रश्नांबाबत केंद्र व राज्य सरकारकडे प्रभावीपणे पाठपुरावा करण्याचे काम राज्य सहकारी महासंघ करीत असतो.
ओहोळ यांच्या निवडीबद्दल आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, दुर्गा तांबे, रणजितसिंह देशमुख, सत्यजित तांबे, इंद्रजित थोरात, अमित पंडित, डॉ. जयश्री थोरात, मिलिंद कानवडे, नवनाथ अरगडे, रामहरी कातोरे, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींनी अभिनंदन केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
© agrowon 2022

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares