आदित्य ठाकरे म्हणाले बांधावर आल्यावर कळत शेतकऱ्यांचं दुःख काय आहे, राज्यभर शेतकऱ्यांना भेटणार – TV9 Marathi

Written by

|
Oct 27, 2022 | 3:50 PM
चंदन पूजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज नाशिक दौऱ्यावर (Nashik Sinnar) आले होते. सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांची भेट घेत समस्यांचा पाढाच आदित्य ठाकरे यांच्या समोर वाचला. यावेळी समृद्धी महामार्गाच्या कामावरून देखील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी ठेकेदार शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमक्या देत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आदित्य ठाकरे पाहणी करणार असल्याने सकाळच्या वेळी रस्ता तयार करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावरूनच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. समृद्धी महामार्ग करत असतांना शेतकऱ्यांचा विचार करायला पाहिजे होता तो न केल्याने आदित्य यांनी शिंदे यांच्यावर काम चांगलं न झाल्याचा ठपका ठेवला आहे. दसरा मेळाव्याला हा महामार्ग सुरू केला होता मात्र आता बंद करून टाकला आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहे.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत हल्लाबोल केला आहे.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, समृद्धीच काम व्यवस्थित नाही झालेले, मजा मस्ती मध्ये सगळे चालले आहे, शेतकरी बांधवांचा धीर सुटत चालला आहे
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, शेतकरी बांधव संकटात कायम उभा असतो आपल्याला त्यांच्यासाठी उभे राहावे लागेल
खाते वाटप होणार, बंगले वाटप होणार पण समस्या सुटणार आहे का ? बांधावर आल्यावर कळत शेतकऱ्यांचं दुःख काय आहे असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
समृद्धीच्या कामात एक्सेस रोड नाही भयानक परिस्थिती मध्ये शेतकरी राहत आहे, अशी परिस्थिती असेल तर जनतेचे कोण ऐकेल असा सवाल यावेळी आदित्य यांनी केला.

शेतकरी बांधव समस्या सांगायला गेले तर ठेकेदाराने शेतकऱ्यांवर बंदूक रोखली, ठेकेदारकडे बंदुकीची लायसन्स आहे का ? पोलीस प्रशासनाने तपास करावे अशी मागणी आदित्य यांनी केली.
दरम्यान शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यभर जाणार असल्याचे देखील आदित्य ठाकरे म्हणाले असून शेतकरी आणि समृद्धी हा मुद्दा घेऊन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष केले होते.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 1517
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares