साहेब, चपरासीसुद्धा फिरकला नाही; अतिवृष्टीग्रस्त शेतकरी ढसाढसा रडले – Lokmat

Written by

Latest Marathi News | लोकमत / Lokmat Marathi newspaper | Live Marathi Batmya | ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com
हिंदी | English
गुरुवार २७ ऑक्टोबर २०२२
FOLLOW US :

शहरं
मनोरंजन
व्हिडीओ
सखी
आणखी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 11:37 AM2022-10-27T11:37:45+5:302022-10-27T11:38:27+5:30
औरंगाबाद – जिल्ह्यातील करमाड तालुक्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांचा अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त क्षेत्रात पीक पाहणी दौरा सुरू आहे. यात बुधवारी फेरन जळगाव व ढवळापुरी या भागात पाहणी सुरू असता ढवळापुरी येथील शेतकरी अक्षरशः ढसाढसा रडले. सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी, महसूल विभाग किंवा कृषी विभागाचे कोणीही साधे पंचनामा करायला देखील आले नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे.
आता तोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे शेवटच्या टप्प्यात परतीच्या अतिवृष्टीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा जवळपास शंभर टक्के खर्च करून झालेला होता. पुढील पंधरा दिवसात सोयाबीन, मूग , उडीद अशा पिकांची सोंगणीची वेळ आली होती. कपाशीच्या देखील अनेक ठिकाणी कैऱ्या सडल्या असून ज्या ठिकाणी कापूस लागलेला आहे तो कापूस देखील पूर्ण भिजून गेलेला आहे. डाळिंबासारख्या फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. त्यामुळे शासनाने हेक्टरी 50 हजार ची मदत करावी अशी मागणी डॉ.कल्याण काळे यांनी केलेली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्याला पहिल्यांदा कृषी मंत्री पद तर अनेक वर्षानंतर स्थानिक पालकमंत्र्यांकडे सहकार मंत्री पद मिळाल्याने आपण त्यांच्याकडे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार असून ते देखील ही परिस्थिती समजून मदत करतील अशी अपेक्षा काळे यांनी व्यक्त केली. मात्र शासनाने जर झोपेचे सोंग घेतले तर वेळप्रसंगी आंदोलन करून शेतकऱ्यांना मदत देईपर्यंत मंत्र्यांना बाहेर फिरू देणार नाही. असा  इशारा देखील त्यांनी यावेळी दिला
 

Web Title: Sir, even the peon did not move; The rain-affected farmers cried profusely in karmat on kalyanraon Kale congress chief of aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

औरंगाबाद – अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान, शासनाकडून पंचनामे होत नसल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांच्यासमोर शेतकरी अक्षरशः रडले pic.twitter.com/bV8XF9qkjV
FOLLOW US :

Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares