Belgaum news : रयत संघटनेचा ऊसाला प्रतिटन 5500 दरासाठी सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा – ABP Majha

Written by

By: विलास अध्यापक, एबीपी माझा | Updated at : 21 Oct 2022 05:37 PM (IST)
Edited By: परशराम पाटील
Belgaum news
Belgaum news : रयत संघटनेनं आज बेळगावमध्ये ऊसाला प्रतिटन 5500 दर मिळण्यासाठी सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली व नंतर सुटका करण्यात आली. यावेळी पोलिस आणि आंदोलनकर्ते शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक आणि बाचाबाची झाली.
गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकरी उसाला प्रती टन 5 हजार 500 रूपये दर मिळावा, या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. गळीत हंगाम सुरू झाला, तरी उसाचा दर जाहीर  केला जात नसल्याने शेतकरी संघटनांनी आंदोलन करत आहेत. काही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या साखर मंत्र्यांनी मध्यस्थी करून आंदोलन मागे घ्यायला लावले होते, पण नंतर काहीच निर्णय झाला नसल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे.
आज सुवर्ण विधानसौधसमोर शेतकऱ्यांनी आंदोलन करून सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना बळाचा वापर करून अटक केली. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी उसाला दर मिळाला पाहिजे, शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो,साखर मंत्र्यांचा निषेध असो,जय जवान जय किसान अशा घोषणा दिल्या.
विधानसौधच्या दिशेने शेतकरी मोर्चा घेऊन येणार असल्याची कल्पना असल्याने निपाणी पोलिसांना याबाबत कल्पना देण्यात आली होती. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालण्याच्या इराद्याने बेळगावच्या दिशेने कूच झाल्यानंतर त्यांना पोलिसांकडून हत्तरगी टोलनाक्यावर अडवण्यात आले. यावेळी चांगलीच झटापट झाली. यावेळी काही शेतकऱ्यांनी अर्धनग्न होत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली. 

पोलिसांनी आजचा घेराव घालण्याचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतरही रयत संघटनेने ठाम भूमिका घेताना प्रत्येक गावामध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 
इतर महत्वाच्या बातम्या
28 October In History : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि  पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नूयी यांचा जन्मदिवस; आज इतिहासात
Textiles Export: वस्त्रोद्योग क्षेत्रापुढे येत्या 5-6 वर्षात 100 अब्ज डॉलर्स निर्यातीचे लक्ष्य: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
‘मतदार यादीतून मुस्लिम-यादवांची नावे कापल्याच्या आरोपाचे पुरावे द्या’, अखिलेश यादव यांना निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस
Amit Shah : 2024 पर्यंत प्रत्येक राज्यात NIA कार्यालय असेल; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महत्वपूर्ण घोषणा
Belgaum News : समितीच्या मेळाव्यात प्रक्षोभक भाषण; रामदास कदम आणि नितीन बानुगडे पाटील यांची खानापूर कोर्टात हजेरी 
Police bharti 2022 : खूशखबर! 14956 पोलीस भरतीची जाहिरात निघाली, एक नोव्हेंबरपासून प्रक्रिया सुरु
Uday Samant : 22 हजार कोटींचा C-295 प्रकल्प एक वर्षापूर्वीच गुजरातला, शिळ्या कढीला उकळी फोडण्याचा प्रयत्न: उदय सामंत
पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Accident : बारामतीत भीषण अपघात, मायलेकासह तिघांचा मृत्यू 
Jayant Patil on Sharad Pawar : वसंतदादांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसल्याची चर्चा, पण जयंत पाटलांनी “तो” किस्सा सांगत केला गौप्यस्फोट!

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares