Farmers Protest: पुणतांब्यातून शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार विविध मागण्यांसाठी पाच दिवसांचे – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 01 Jun 2022 09:15 AM (IST)
Edited By: श्रीकांत भोसले
Farmers Protest: पुणतांब्यातून शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार; विविध मागण्यांसाठी पाच दिवसांचे धरणे आंदोलन
Farmers Protest : पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा संप पुकारून राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ऐरणीवर आणणाऱ्या अहमदनगर येथील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. पुणतांब्यात आजपासून पाच दिवसांचे धरणे आंदोलन सुरू होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. 
पाच वर्षांपूर्वी , 2017 मध्ये पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी एक जूनपासून शेतकरी संपाची हाक दिली होती. त्यानंतर राज्यातील इतर शेतकरी संघटना या आंदोलनात उतरल्याने राज्यात तत्कालीन भाजप सरकारविरोधात शेतकरी आंदोलनाचा वणवा पेटला होता. आता, त्याच पुणतांब्यातून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
राज्यातील शेतकरी सगळ्या बाजूने आज अडचणीत सापडले आहेत. शेतात ऊस उभा आहे. कांद्याला भाव नाही, द्राक्ष टरबूज फेकून देण्याची वेळ आली आहे. तर विजेच्या संकटाने शेतकरी त्रस्त झाले असल्याचे पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी म्हटले. आजपासून ५ जूनपर्यंत पुणतांब्यातील शेतकरी गावात धरणे आंदोलन करणार आहेत. यामध्ये आंदोलनात राज्यभरातले शेतकरी सहभागी होणार आहेत. ५ जूनपर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करु, असा इशारा पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे. 
कृषी दिंडीने आंदोलनाला प्रारंभ

बळीराजाच्या पुतळ्याला दुग्धभिषेक करून गावातून कृषी दिंडीने पुणतांबा धरणे आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची माहिती सरपंच धनंजय धनवटे यांनी दिली. पुणतांबा ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलनासाठी मंच उभारला आहे. हे आंदोलन 1 ते 5 जून पर्यंत सुरू असणार आहे. राज्यातील अनेक शेतकरी नेत्यांशी आंदोलनाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती सरपंच धनंजय धनवटे यांनी दिली. 
>> कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन:
1) ऊसाला एकरी एक हजार रूपये अनुदान द्यावे
2) शिल्लक ऊसाला हेक्टरी दोन लाख रूपये द्यावे
3) कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा
4) कांद्याला प्रती क्विंटल 500 रूपये अनुदान द्यावे
5) शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण आणि सुरळीतपणे वीज मिळावी
6) थकित विजबिल माफ झाले पाहिजे
7) कांदा आणि गव्हाची निर्यात बंदी उठवावी
8)सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी त्यासाठी आयोगाची स्थापना करून निर्णय घ्यावा
9) 2017 साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी
10) नियमित कर्ज भरणारांचे अनुदान दिले जावे
11) दुधाला ऊसाप्रमाणे एआरपी लागू केला जावा
12) दुधाला कमीतकमी चाळीस रूपये दर दिला जावा
13) खाजगी दूध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी
14) वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जावी
15) शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेतले जावे
16) वन हक्क कायद्यानुसार आदिवासींच्या जमिनी त्यांच्या नावावर केल्या जाव्या
Shetkari Sanghatana : ओला दुष्काळ जाहीर करा, मागणीसाठी शेतकरी संघटनाची आज ऑनलाईन मोहीम, सहभागी होण्याचं आवाहन
Yavatmal News : मृत्युपूर्वी तो मुलांशी व्हिडीओ कॉलवर अखेरचा बोलला आणि जीव सोडला; शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले
Agriculture News : नंदूरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी संकटात, बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव 
Pandharpur Agitation : ऊस दराचा प्रश्न पेटला, पंढरपुरात आंदोलनाला हिंसक वळण, ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडलं
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, भारताच्या बायोटेक रेग्युलेटर GEAC ने GM मोहरीच्या व्यावसायिक लागवडीस मान्यता
Girish Mahajan interview by Avadhoot Gupte : अवधूत गुप्ते यांचे प्रश्न, गिरीश महाजन यांची उत्तरं
Himachal Pradesh Election 2022 : हिमाचल प्रदेशात भाजपनं दिलाय ‘चहावाला’ उमेदवार; मोदींशी होतेय तुलना, संपत्ती तर…
IND vs NED, 1st Inning Highlights : विराट-रोहितसह सूर्यानंही ठोकलं दमदार अर्धशतक, भारताकडून नेदरलँडला 180 धावांचं लक्ष्य
Indian Team Players Match Fee : बीसीसीआयची मोठी घोषणा, पुरुष आणि महिला खेळाडूंना मिळणार समान मानधन
अखेर डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा ताबा बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे, मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार उद्घाटन

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares