बापरे! घशातील फुलपाखरासारख्या थायरॉईडचा झाला 'नारळ'; 3 तास ऑपरेशन केलं शेवटी… – MSN

Written by

नई दिल्‍ली, 28 ऑक्टोबर :  बिहारच्या बेगुसरायमध्ये राहणारा 72 वर्षांचा शेतकरी. ज्याला गेल्या 6 महिन्यांपासून श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याला काही गिळतानाही अडचण येत होती. दिवसेंदिवस त्याचा त्रास वाढू लागला. अधिक समस्या होऊ लागल्यानंतर अखेर त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली. तिथं त्याच्या काही तपासण्या करण्यात आल्या. तेव्हा त्याच्या घशात जे दिसलं ते पाहून धक्काच बसला. त्याच्या घशातील फुलपाखरासारखी नाजूक थायरॉईड ग्रंथी नारळासारखी झाली होती.
दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात हा शेतकरी उपचारासाठी आला होता. तिथं नेक ऑन्‍को सर्जरी, ईएनटी विभागात त्याची तपासणी करण्यात आली. नेक ऑन्को सर्जरीचे प्रमुख डॉ. संगीत अग्रवाल म्हणाले, गेल्या कित्येक वर्षांच्या अनुभवात मी मोठ्या थायरॉईड ट्युमरच्या जवळपास २५० पेक्षा जास्त सर्जरी केल्या आहेत. पण हे प्रकरण वेगळंच होतं. हा ट्युमर वजन आणि आकारात खूप मोठा आहे. सामान्यपणे थायरॉईड ग्रंथी १० ते १५ ग्रॅमचा असते. तिचा आकार ३-४ सेमी असतो. ती फुलपाखरासाखी असते. पण या रुग्णाच्या प्रकरणात ग्रंथी १८ ते २० सेमी म्हणजे नारळापेक्षाही मोठ्या आकाराच्या ट्युमरमध्ये बदलली.
हे वाचा – Shocking! आधी डोळ्यांची दृष्टी गेली नंतर जीव; अज्ञात आजाराचे 48 तासांत 5 बळी
अखेर डॉक्टरांनी त्याची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. पण ही सर्जरी आव्हानात्मक होती. कारण यात बरेच धोके होते, असं डॉक्टरांनी सांगितलं.
ऑपरेशनबाबत माहिती देताना डॉ. अग्रवाल म्हणाले, तब्बल ३ तास ऑपरेशन चाललं. यात बरीच आव्हानं होती. सर्वात मोठं चॅलेंज म्हणजे ट्युमर काढताना रुग्णाचा आवाज वाचवणं. सुदैवाने त्याचे दोन्ही व्होकल कॉर्ड नव्हर्स वाचवता आले. दुसरं आव्हान होतं ते म्हणजे ट्युमर बऱ्याच ब्लड व्हेसेल्सने भरलेलं होतं. त्यामुळे रुग्णात रक्तातीत कमतरता होण्याचा धोका होता. त्यामुळे रक्तवाहिन्यांना हानी पोहोचणार नाही याची काळजी आम्ही घेतली. यामुळे रुग्णाला काही गंभीर दुखापत झाली नाही. अशा मोठ्या ट्युमर्समध्ये कॅल्शिअम संरक्षित करणं आणि पॅरा थायरॉईड ग्लँडला ठिक ठेवणं हेसुद्धा आव्हानात्मक असतं. पण या प्रकरणात चारही पॅरा थायरॉईड ग्लँड्स वाचवण्यात यश मिळालं. त्याच्या वायुनलिकेवर दबाब होता. त्यामुळे एनेस्थियासाठी खास टेक्निक वापरण्यात आली.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares