सोलापुरात शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ माकपची निदर्शने: ओला दुष्काळ जाहीर करून हेक्‍टरी 50 हजार रुपये द्या; कार… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
राज्यात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. असे असताना या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान देखील झाले. अशातच येत्या पंधरा दिवसांत जर महाराष्ट्र राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून पीक सरंक्षण विम्याकडून अग्रीम विमा सह प्रति हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई नाही दिल्यास डावी लोकशाही आघाडी व पुरोगामी संघटनांना विश्वासात घेऊन महाराष्ट्र बंद करू.
तसेच शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ 50 हजार कामगार सोलापूरात रस्त्यावर उतरतील आणि सरकारला सळो की पळो केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा वज्रनिर्धार ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले.
प्रश्न सुटरणार कधी ?
आधीच कर्जबाजारी आणि बेरोजगारीने त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना या नैसर्गिक संकटालाही तोंड देताना नाकीनऊ येत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी घोषणा करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही. राज्य सरकार आर्थिक मदत आणि विमा मिळवून देण्यासाठी असमर्थ ठरली आहे. तातडीने राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदत करावे.ही प्रमुख मागणी घेऊन गुरुवार 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मा.जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली व माकपचे जिल्हा सचिव अँड एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेधाचे फलक दाखवण्यात आले.
काय म्हणाले आडम मास्तर?
यावेळी आडम मास्तर पुढे बोलताना म्हणाले की, आज संबंध महाराष्ट्रभर व देशभर दीपोत्सव साजरा होत असताना जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजा शेतकरी बांधवांच्या घरी दिवा प्रज्वलित करायला ही तेल नाही, स्वयंपाकघरात तेल नाही अशा घनघोर गंभीर परिस्थितीशी सामना करण्याची वेळ परतीच्या पावसामुळे आली आहे. शेतकऱ्यांची ही आर्त हाक ऐकायला सरकार कडे वेळ नाही. या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी बँकेतून कर्जे घेऊन मका, कापूस आणि सोयाबीन ची लागवड केली त्यासाठी जीवाचे रान करून मेहनत घेतली परंतु ही मेहनत परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले. याची दखल घेत कर्तव्यदक्ष सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उभे राहतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. मात्र ही अपेक्षा भंग पावली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares