Aditya Thackeray : शेतकऱ्यांमुळे समृद्धी महामार्ग, त्यांच्यावरच ठेकेदारांकडून बंदुकीचा – ABP Majha

Written by

By: गोकुळ पवार | Updated at : 28 Oct 2022 10:24 AM (IST)

Nashik Aditya Thackeray
Aditya Thackeray : समृद्धी महामार्गाचे (Samrudhhi Highway) काम चांगले झाले नाही. ज्यांच्या हातात काम होते, त्यांनी काही केलं नाही. स्थानिक शेतकऱ्यांवर (Farmers) बंदुकी रोखण्याचे काम इथल्या ठेकेदारांकडून (Contractor) केले जात आहे. त्या ठेकेदारांकडे ( बंदुकीचे लायसन्स आहेत का? असा सवाल यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी उपस्थित केला. 
माजी मंत्री तथा शिवसेना नेते (shivsena) आदित्य ठाकरे नाशिक (Nashik) दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सिन्नर (Sinnar Taluka) तालुक्यातील सोनोरी या नुकसानग्रस्त भागांत पाहणी दौरा केला. त्याचबरोबर समृद्धी महामार्गालागतच्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी ते बोलत होते. समृद्धीचे शेतकऱ्यांनी सहमती दिली म्हणून होत आहे. मात्र आता शेतकऱ्यांनाच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. समृद्धीच काम चांगले झाले नाही. ज्यांच्या हातात काम होते, त्यांनी काही केलं नाही. त्यामुळे गावोगावी रस्त्यांचा एक्सेस नसल्याने रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. समृद्धीच्या कामात एक्सेस रोड नाही, येथील शेतकरी भयानक परिस्थिती मध्ये ते राहत आहे. अशी परिस्थिती असेल तर जनतेचे कोण ऐकेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
तसेच समृद्धी मुळे अनेक शेतकरी बांधवांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. महामार्गालगत असलेल्या नाल्यामुळे पावसाचे पाणी थेट शेतात घुसत असल्याने नुकसान होत आहे. याबाबत शेतकरी बांधव समस्या सांगायला गेले तर ठेकेदाराने शेतकऱ्यांवर बंदूक रोखल्याचे समजले. मग या ठेकेदारकडे बंदुकीची लायसन्स आहे का? याप्रकरणी पोलीस प्रशासनाने तपास करावे. शिवाय दसरा मेळाव्यासाठी राजकीय कार्यकर्ते आले, तेव्हा त्यांना समृद्धी वापरू दिला आता बंद करून ठेवला, अस का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे समृद्धीच काम व्यवस्थित झालेले नाही. समाज म्हणून एकत्र यावे, राजकारण बाजूला ठेवून आम्ही सोबत आहोत, राजकारण बाजूला ठेवून खांद्याला खांदा लावून उभे राहू, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले , शेतकरी बांधवाना मदत करणे गरजेचे असून पर्यावरण मंत्री होतो, त्यामुळे  मला माहित आहे की वातावरण बदलामुळे अतिवृष्टी आणि अशी संकटे उभे राहत आहेत. अन्नदाता म्हणून त्यांचे नुकसान होत आहे. बांधावर आल्यावर कळत शेतकऱ्यांचं दुःख काय आहे. त्यामुळे खदखद बाहेर येते आहे. कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेणे आवश्यक आहे. लोकांना जस कृषी मंत्री माहीत नाही तस आम्हाला मुख्यमंत्री माहीत नाही ते आम्हाला दिसत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.

शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार आहेत का?…
रस्त्यावर उतरण्याची गरज का आली हे त्यांना कळले पाहिजे. लोकांचे आवाज ऐकणे गरजेचे आहे. आपत्ती येत असते संकट येत असते, त्याला तोंड देणं महत्वाचे आहे. मात्र हे सरकार काम करत नाही अस निदर्शनात येत आहे. मजा मस्ती मध्ये सगळे चालले असून यात शेतकरी भरडला जात आहे. परिणामी शेतकरी बांधवांचा धीर सुटत चालला असून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकरी बांधव संकटात असल्यावर  कायम उभा असतो, आपल्याला देखील त्यांच्यासाठी उभे राहावे लागेल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पुढील काळात खाते वाटप होणार, बंगले वाटप होणार पण समस्या सुटणार आहे का? असा खरमरीत सवाल त्यांनी यावेळी केला.
Maharashtra News Live Updates : आता वैद्यकीय शिक्षण मराठीतून, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Rohit Patil on Tata Airbus Project : सगळे प्रकल्प महाराष्ट्रातून एकाच राज्यात का नेले जात आहेत? रोहित पाटलांचा हल्लाबोल
Abdul Sattar: अब्दुल सत्तारांचा पीक नुकसानीच्या आढावा बैठकीत शाही थाट; खाण्यासाठी चक्क काजू-बदामची सोय
विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! कार्तिकी यात्रेसाठी देवाचा पलंग निघाला, आजपासून 24 तास दर्शन
Coriander Rate : गृहिणींची डोकेदुखी वाढली! नाशिकमध्ये कोथंबीर जुडी चाळीस रुपयांवरून 100 रुपयांवर!
PM Modi: फक्त गन नव्हे तर पेन घेतलेल्या नक्षलवादाचाही बिमोड करा; PM मोदी यांचे आवाहन
Johnson & Johnson ची FDA विरोधात हायकोर्टात धाव, बेबी पावडरचा उत्पादन आणि विक्री परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी
T20 World Cup 2022 : पाकिस्तानची खराब कामगिरी शोएब अख्तर झोंबली, म्हणतो ‘पुढच्या आठवड्यात भारतही स्पर्धेबाहेर होणार’
Medical Education : आता वैद्यकीय शिक्षण मराठीतून, राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ शाखांचा समावेश
Parag Agrawal : ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह तीन बड्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी, एलॉन मस्क यांचा ट्विटर खरेदीनंतर मोठा निर्णय

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares