The BJP MLA requested with folded hands भाजपच्या आमदाराने हात जोडून केली 'ही' विनंती – Times Now Marathi

Written by

उस्मानाबाद : भारतीय जनता पार्टीचे तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील ( BJP Mla Ranajagajitsinh Patil  ) यांनी हात जोडून शेतकऱ्यांना एक विनंती केली आहे. शेतकऱ्यांनो तुम्ही आत्महत्या करू नका, सरकार आपल्या हक्काचे आहे. असं आमदार पाटील यांनी म्हटलं आहे. शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadanvis Goverment) हे शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे. हे सरकार शेतकऱ्यांना मदत करणारे आहे. एक एक विषय आपण पूर्ण ताकतीने मार्गी लावत आहोत. दिवाळी पूर्वी मदत मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा, सरकार संवेदनशील असून जलद गतीने काम करीत आहे असल्याचं आमदार पाटील यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा ; सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही 5500 रुपयांनी झाली स्वस्त
पुढे बोलतना आमदार पाटील म्हणाले की, निसर्गावर कोणाचेही नियंत्रण नाही. परतीचा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. मात्र, खचून जाण्याची गरज नाही. पीक विमा व इतर मदत मिळण्यासाठी प्रयत्न करीत असून शेतकरी बांधवाना आत्महत्या न करण्याची विनंती आमदार राणा पाटील यांनी केली.
अधिक वाचा ; अंधेरी पोटनिवडणुकीत 24 उमेदवार रिंगणात, कोण मारणार बाजी? 
पीक विम्याच्या श्रेयावरून उस्मानाबाद जिल्ह्यात आरोप- प्रत्यारोप होत आहेत. जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होता. खासदारांनी केलेल्या आरोपानंतर भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असून, त्यांच्या अकलेची कीव येते, ज्ञान व संस्कार नाहीत. ते त्यांच्या संस्कार प्रमाणे वागतात. त्यांना काही इंग्रजी शब्द उच्चारता येत नाहीत त्यांच्याशी मी काय चर्चा करणार असे सांगत राणा पाटील यांनी पलटवार केला आहे. माझ्यावर जे आरोप केले आहेत त्यात तथ्य नसून न्यायालयाने दिलेले निकाल, घटनाक्रम, तारीख याचा अभ्यास करावा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
अधिक वाचा : वाढत्या वयानुसार बदला या सवयी…व्हाल दीर्घायुषी, राहाल तरुण 

शेतकऱ्यांना 1200 कोटी दिवाळीपूर्वी न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनाच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिला होता. यावर बोलताना आमदार राणा म्हणाले की, गेली 3 वर्ष सरकार असताना त्यांनी काय दिवे लावले हे सर्वांना माहित आहे, इतके दिवस का आंदोलन केले नाही. त्यांनी आता तरी जागे व्हावे ही चांगली गोष्ट आहे. आम्ही सर्व कामे करीत आहोत त्यामुळे मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीची गरज नाही, त्यांनी फक्त वाट पहावी असं आमदार राणा पाटील यांनी म्हटलं आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares