…अन्यथा असहकार आंदोलन उभारू – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
59021
वैभववाडी ः महावितरणचे उपकार्यकारी अभियंता कृष्णांत सूर्यवंशी यांना निवेदन देताना तालुका व्यापारी मंडळ.
…अन्यथा असहकार आंदोलन उभारू
वैभववाडी व्यापारी मंडळ; वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २८ ः शहरासह तालुक्यात सर्वत्र सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे कित्येक व्यापारी आणि ग्राहकांची विद्युत उपकरणे नादुरूस्त झाली आहेत. कमी दाबाने विज पुरवठा होत असल्यामुळे हे प्रकार वारंवार घडत असतानाही महावितरण त्या त्रुटी दुर करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलताना दिसत नाही. ३१ डिसेंबरपूर्वी तालुक्यातील विज पुरवठा सुरळीत झाला नाही तर १ जानेवारी २०२३ पासून महावितरण विरोधात असहकार आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा व्यापारी मंडळाने दिला आहे.
व्यापारी मंडळाच्यावतीने येथील महावितरणचे उपकार्यकारी अधिकारी कृष्णांत सुर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर कदम, उपाध्यक्ष अरविंद गाड, मनोज सावंत, संताजी रावराणे, संतोष कुडाळकर, तेजस आंबरेकर, वसंत पटेल, रविंद्र पाटील, तेजस साळुंखे आदी उपस्थित होते. व्यापारी मंडळाने महावितरणला अखेरचा इशारा दिला आहे. कमी दाबाने विज पुरवठा होत असल्यामुळे आतापर्यत संगणक, लॅपटॉप, इन्हर्टर, प्रिंटर, बॅटरी, युपीएस यांसारख्या हजारो रूपये किंमतीच्या उपकरणांचे नुकसान झालेले आहे. यासंदर्भात मागील आमसभेत देखील प्रश्न उपस्थित केल्यानंतर महावितरणने हा प्रश्न तत्काळ सोडविण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु, आता वर्ष उलटुन गेल्यानंतर कमी दाबाने विज पुरवठ्याचा प्रश्न कायम आहे. महावितरणच्या कारभाराला तालुक्यातील व्यापारी, शेतकरी आणि ग्राहक कंटाळले असून या विभागाबद्दल सर्व घटकांच्या मनात रोष आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ग्राहकांकडुन वाईट अनुभव येऊ शकतात. त्यामुळे महावितरणने ३१ डिसेंबर २०२२ पर्यत बाजारपेठेसह तालुक्यातील विज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा १ जानेवारी २०२३ पासून महावितरण विरोधात असहकार आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा व्यापाऱ्यांनी आज महावितरणला दिला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares