आंदोलनाचा इशारा: सीना पात्रात मृतदेह दफन करण्याचा प्रयत्न ; नागरिकांचा आहे विरोध – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
शहरातील वारुळाचा मारुती परिसरात बेवारस मृतदेहांचा महापालिकेमार्फत दफन विधी केला जातो. त्यासाठी जागाही आरक्षित केलेली असताना तेथे दफनविधी न करता रस्त्याच्या काही अंतरावर सीना नदी पात्राच्या शेजारी अवघ्या दीड फुटाचा खड्डा घेऊन दफनविधी केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परिसरातील नागरिकांनी याला विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.वारुळाचा मारुती येथील नागरिक राजू रोहकले, बंडू रोहकले, बाबू ठाणगे, विकी वाघ, रवींद्र वाबळे, गणेश सुरसे, अरुण कदम, पिंटू रोहकले, विश्वास देंडगे, विशाल वाघ, अरुण म्हस्के, आदित्य शिंदे, सचिन वाघ, किरण वाघ, पिंटू रोहकले,देविदास ठाणगे, सुभाष रोहकले, गोटू रोहकले यांनी नदी पात्रालगत सुरू असलेल्या दफन विधीला विरोध दर्शवला.
जमिनीच्या अवघ्या एक फूट अंतरावर मृतदेह दफन केले जात असल्याने भटकी कुत्री हे मृतदेह पुन्हा उकरून काढतात. मोकाट कुत्रे मृतदेहाचे अवयव शेजारी असलेल्या शेतकरी कुटुंबांच्या वस्तीत टाकतात.या संदर्भात नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने आयुक्तांना अनेकदा निवेदने देण्यात आली होती. दफन विधी करताना किमान तीन-चार फूट खोल अंतरावर खड्डे घ्यावेत. जी जागा दफनविधीसाठी आरक्षित केली आहे, त्याच ठिकाणी दफनविधी करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares