आज जिल्हा बंदची हाक: पाचव्या दिवशीही उपोषण सुरू, दखल न घेतली गेल्यामुळे शेतकरी हिंसक – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
अतिवृष्टी, सततचा पाऊस व पीक विम्याचे रक्कम सरकार आणि विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.२४ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. उपोषणाचा शुक्रवारी पाचव्या दिवशीही आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकरी आणि पाठिंबा देण्यासाठी आलेल्यांनी संताप व्यक्त करत बसवर दगडफेक केली. तसेच काही आंदोलक थेट जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीवर चढले होते. काही ठिकाणी रस्ता रोको तर काही गावात जल समाधी आंदोलन करण्यात आले.
आमदार पाटील यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी,अशी मागणी करीत ती मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी उपोषण सुरू केले असून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अद्यापही आंदोलन सुरु आहे, त्यास मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहेत. विशेष म्हणजे शासन प्रशासनाकडून या आंदोलनाची दखल घेतली नसल्याने आज आंदोलनास हिंसक वळण लागले. काही शेतकऱ्यांनी परिवहन विभागाच्या एसटी बसवर दगडफेक करत नुकसान केले. तसेच आंदोलन स्थळी जय भवानी जय शिवाजीच्या जय घोषणांनी पूर्ण परिसर दणाणून गेला होता. पाचव्या दिवशी कैलास पाटील यांची प्रकृती काही प्रमाणात खालावली असून त्यांचे वजन घटले आहे. शेतकऱ्यांची पुकारलेल्या आंदोलनास मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.
शहर बंदची हाक
उपोषणाला शासन प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कैलास पाटील यांना प्रतिसाद म्हणून शिवसेनेच्या वतीने शनिवारी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. त्याची सुरुवात शुक्रवारी सायंकाळ पासूनच प्रारंभ केला होता. अनेक भागात दुकानं बंद करण्यासाठी कार्यकर्ते फिरत होते.
प्रशासनाला फुटला घाम
उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी अचानक दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडत रस्त्याची एक बाजूच बंद केली होती. तसेच जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तसेच काही शेतकरी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे प्रशासनाला घाम फुटला होता. तासभर आंदोलक इमारतीवर चढून होते.
आंदोलनास हिंसक वळण
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असून अद्याप पर्यंत यावर कोणताच तोडगा निघाला नसल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक करीत तोडफोड केली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. तसेच सायंकाळी काही कार्यकर्त्यांकडून दुकाने बंद करण्यासाठी शहरातील काही भागात दुकानं बंद सुरु करण्याचा खेळ सुरु होता.
पाडोळीत जलसमाधी आंदोलन
शेतकऱ्यांच्या हक्का साठी, सुरु केलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला, आता शेतकऱ्यांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी येथील शेतकऱ्यांनी आज जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे. जोपर्यंत आमदार पाटील यांनी केलेल्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत पाण्याच्या बाहेर येणार नसल्याचा निर्धार पाडोळी येथील शेतकऱ्यांनी व्यक्त करत आंदोलन सुरू केलं आहे. पीकविमा, शेतकरी अनुदान आणि ओल्या दुष्काळाच्या मागणी साठी सुरू केलेल्या आंदोलनाचे लोण आता गावोगावी पसरत चालले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares