आपदग्रस्त कुटुंबांना मदत: ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे’ ; पालकमंत्री अतुल सावे यांचे प्रतिपादन – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
सध्या राज्यात परतीच्या पावसाने थैमान मांडले आहे. शेती व शेतपिकांचे नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांनी धीर सोडू नये. शिंदे – फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेऊन, आर्थिक आधार देण्याचे काम सुरु केले आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध आहे. नुकसानीमुळे खचून जाऊ नये. सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास बीड जिल्हाचे पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.
भानकवाडी व दगडवाडी येथील आपदग्रस्त कुटुंबांना शासनाच्या वतीने मदतीचा धनादेश देण्यात आला. परिसरातील नुकसान ग्रस्त शेतपिकांची पाहणी करून सावे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. भानकवाडी येथील कुंडलिक सोनसळे यांच्या दोन मुली व एक ३० वर्षीय सिरसमार्ग येथील पाहुणा साईनाथ भोसले वाहुन गेला. या घटनेत तीनही मयत झाले. तसेच दगडवाडी येथील रावसाहेब जायभाये शेतामध्ये असताना अंगावर विज कोसळल्याने ते जागीच ठार झाले. पालकमंत्री अतुल सावे, खा.डॉ.प्रितम मुंडे, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, राजेंद्र मस्के नामदेव टीळेकर यांनी जायभाय व सोनसळे कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. शासनाच्या वतीने जायभाय कुटुंबाला चार लक्ष रुपये, सोनसळे कुटुंबाला आठ लक्ष रुपय मदतीचा धनादेश देण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares