रवी राणांच्या विरोधात प्रहारचे जोडे मारो आंदोलन – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
औरंगाबाद : विविध योजना, लाभापासून वंचित, दिव्यांग, गरीब, शेतकरी आदींसाठी झटणारे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने बदनामीकारक वक्तव्य करणारे अमरावतीच्या खासदार रवी राणा यांचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी क्रांती चौक येथे शुक्रवारी (ता.२८) रोजी निषेध व्यक्त करुन जोडे मारो आंदोलन केले.
प्रहारचे युवा जिल्हाध्यक्ष कुणाल राऊत, प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो बच्चू कडू व प्रहार समर्थकांनी सहभाग घेतला. गेल्या दहा वर्षात माजी राज्यमंत्री बच्चू कडूंनी दिव्यांगांच्या विविध योजना मार्गे लागाव्यात म्हणून शेकडो आंदोलने केली.
दिव्यांग कल्याण पुनर्वसनासाठी राज्य शासनाकडून ४० पेक्षा जास्त शासन निर्णय तयार करून घेतली. शेतकरी, निराधार, वंचित व दुर्बल घटकासाठी कायम रस्त्यावरील लढाई लढणाऱ्या बच्चू कडू यांच्यावर बिन बुडाचे आरोप करणाऱ्या रवी राणा याच्या प्रतिमेस आंदोलनकर्त्यांनी चपलाने मारहाण केली.
याप्रसंगी प्रहारचे शहराध्यक्ष दत्ताभाऊ साळकर, महानगर प्रमुख प्रदीप त्रिभुवन, जिल्हाध्यक्ष बाळू भोसले, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. घोडके, मुसा शेख, शांताराम बनकर, धोंडिराम सकुंडे, पटेल, सुनील हुस्के, युवराज पाटील, दादासाहेब पाचपुते, रशीद शेख, शेरू पटेल, राजेंद्र शिंदे, काकासाहेब एरंडे, जावेद शेख, उमेश चौधरी, प्रल्हाद दुबिले, अंजली पुजारी, सुशील काळे, विकास राठोड, छाया दरेकर, बेबीनंदा भसांडे आदींची उपस्थिती होती.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares