Womens Equality Day 2022 : पुरुषांप्रमाणे महिलांनाही असावी कामाच्या ठिकाणी समानता 'या' गोष्टींची – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 24 Aug 2022 03:32 PM (IST)
Edited By: प्रिया मोहिते
Womens Equality Day 2022
Womens Equality Day 2022 : महिला समाजाचा असा एक घटक आहेत की ज्याशिवाय समाजाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. आजच्या काळात आपण कितीही स्त्री-पुरूष समानता म्हटलं तरी समाजाच्या तळागाळात अजूनही स्त्रियांना समान वागणूक दिली जात नाही. एक काळ असा होता की, देशात महिलांना संपत्तीचा आणि मतदानाचा अधिकार नाकारला गेला होता. त्याविरोधात महिलांनी मोठी चळवळ उभी केली आणि सरकारला ते अधिकार देण्यास भाग पाडलं. 26 ऑगस्ट 1920 साली महिलांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाला. याच दिवसाच्या स्मरणार्थ जगभरात 26 ऑगस्ट या दिवशी महिला समानता दिवस (Women’s Equality Day 2022) साजरा केला जातो. कामाच्या ठिकाणी महिला समानता म्हणजे नेमकं काय? महिलांना कोणते हक्क मिळावेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 
कामाच्या ठिकाणी अशी असावी महिला समानता : 
1. समान वागणूक मिळावी : कामाच्या ठिकाणी अनेकदा आपण पाहिले आहे की, बहुतेक बॉस हे पुरुषच असतात. पुरुषी व्यवस्था असल्यामुळे अनेकदा वर्चस्व गाजवणं, राग काढणं, गृहीत धरणं यांसारखे प्रकार महिलांच्या प्रती पाहायला मिळतात. मात्र, असे न होता पुरुषांप्रमाणेच महिलांनाही कामाच्या ठिकाणी समान वागणूक मिळावी. महिला देखील बॉसची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतात. तसेच चांगले निर्णय घेऊ शकतात. 
2. वेतनात समानता असावी : अनेकदा आपण पाहतो पुरुषांचा पगार हा महिलांच्या पगारापेक्षा दुप्पट असतो. स्त्रियांची क्षमता, शिक्षण असूनही त्यांना कमी लेखले जाते आणि कमी वेतन दिले जाते. अशा वेळी महिलांनी देखील आपल्या हक्कांबाबत बोलले पाहिजे. ज्याप्रमाणे पद त्याप्रमाणे वेतन हे महिलांना देखील मिळालेच पाहिजे. 

3. सुट्ट्यांच्या बाबतीत समान हक्क : अनेकदा पुरुषांना त्यांच्या वैयक्तिक कारणावरून तसेच अडचणीमुळे सुट्टी दिली जाते. महिलांच्या बाबतीत जरी काही कारणं गृहीत धरली तरी मात्र हे चित्र पूर्णपणे बदललेलं नाही. अजूनही काही भागांत ऑफिसच्या ठिकाणी महिलांना  त्यांच्या हक्काच्या सुट्ट्या मिळत नाहीत. त्यामुळे असे प्रकार थांबवले गेले पाहिजेत. 
4. प्रसूतीची सुट्टी (Pregnancy Leave) : महिलांना प्रसूतीच्या काळात अनेक वेदना होतात. अनेकदा या वेदना असह्य असतात. त्यामुळे प्रत्येक ऑफिसच्या ठिकाणी महिलांना सक्तीची प्रसूती सुट्टी असलीच पाहिजे. महिला जर स्वेच्छेने कामावर येत असतील तर याबाबत वाद नाही. मात्र, त्यांना नाईलाजाने कामावर येण्याची सक्ती नसावी. 
महत्वाच्या बातम्या : 
Vitiligo Leukoderma : त्वचेवर दिसणारे पांढरे डाग कसे तयार होतात? असू शकतो Vitiligo आजार; वेळीच ओळखा ‘ही’ लक्षणं
Indian Team Players Match Fee : बीसीसीआयची मोठी घोषणा, पुरुष आणि महिला खेळाडूंना मिळणार समान मानधन
Obesity And Menstruation : लठ्ठपणा आणि मासिक पाळी यांच्यातील परस्पर संबंध
Carbohydrates Food : वजन कमी करायचं आहे? कमी कर्बोदकयुक्त पदार्थांचा करा आहारात समावेश
Solar Eclipse : सुरक्षितपणे सूर्यग्रहण कसे पाहावे? ‘अशी’ घ्या काळजी
रघुवंशींनी हात जोडले, मुख्यमंत्र्यांनी मंचावरुनच फोन फिरवला, तात्काळ 7 कोटी मंजूर!
Shiva Statue : जगातील सर्वात उंच शिवमूर्तीचं लोकार्पण, 369 फुटी ‘विश्वास स्वरूपम’ची ‘ही’ आहे खासियत
ABP Majha Impact : एबीपी माझाच्या दणक्यानंतर कोल्हापुरात 24 तासांमध्ये रस्त्यांचे काम सुरु, पण पॅचवर्क करताना महापालिकेची “चिंधीगिरी” सुरुच! गुणवत्तेला तिलांजली 
Shadab Khan: झिम्बाब्वेविरुद्ध पराभव जिव्हारी, शादाब खान पव्हेलियमध्येच ढसाढसा रडला; इमोशनल व्हिडिओ समोर
Gulabrao Patil on Ravi Rana and Bachchu Kadu : देवेंद्र फडणवीस जी,रवी राणांना तात्काळ आवरा,अन्यथा…

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares